यवतमाळ सामाजिक

निराधार महिलांना मार्गदर्शन

निराधार महिलांना मार्गदर्शन

आज १९ मार्च ला जागतिक महिला दिन व विधवा महिला मार्गदर्शन स्नेहमिलन . जनसेवा फाऊंडेशन आणि तेजस्विनी सेवा समिती यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने तेजस्विनी छात्रावास पुष्पकुंज सोसायटी यवतमाळ येथे विधवा निराधार महिलांना मार्गदर्शन देण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुलभा ताई गौड अध्यक्ष तेजस्विनी सेवा समिती या होत्या. मुख्य मार्गदर्शक मा. अजयजी मुदडा अध्यक्ष दि. यवतमाळ अर्बन बँक यवतमाळ प्रमुख वक्ते राजूभाऊ निवल व्यवस्थापक उद्योजक पार्वती अँटो मोबाईल यांनी मोलाचे मार्गदर्शन करून विधवा महिलांना रोजगार व स्वयंरोजगार या बाबत माहिती दिली. जनसेवा फाऊंडेशन चे अध्यक्ष रामचंद्र ढोबळे काका यांनी आपल्या प्रास्ताविक मध्ये गेल्या दोन वर्षांत संस्थेचे कार्य चार जिल्ह्यात कशा प्रकारे केले. विधवा – निराधार महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून स्वतःच्या पायावर उभे करून त्यांना बांगडी व्यवसाय, ज्वेलरी व्यवसाय, भाजिगाडा, शेळी पालन, शिलाई मशिन देऊन आज पर्यंत ४७ महिलांना रोजगार उभा करून संस्थेने मदतीचा एक हात असे समाज कार्य करीत आहे. तसेच आज कार्यक्रमात श्रीमती. सविता ताई शिंदे सावरगड यांना शिलाई मशीन देऊन मदत करण्यात आली.कार्यक्रमाला संस्थेचे संचालक मंडळ व सहयोगी संचालक कळंब तालुका संजयभाऊ भोयर, आर्णी ता. राजेश अग्रवाल, विशाल धनकसार, राजुभाऊ तांदळे, संतोषजी भोयर, तीतुरकर , जयस्वालजी, फुलकर काका, सौरभ देशपांडे, एकल विद्यालय रुई सौ. शितल ताई जुल्लरवार , सौ. वैशाली पजगाडे, कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु. मिनाक्षी ढोबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन संचालक सुभाषजी सगणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोहनराव केळापूरे सर व संस्थेचे सचिव डॉ. भूषणकुमार ढोबळे यांनी मेहनत घेतली.

Copyright ©