यवतमाळ सामाजिक

न प घाटंजी च्या वतीने उत्कृष्ट उद्योजक महिला बचत गट व सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार

प्रतिनिधी घाटंजी अमोल नडपेलवार

न प घाटंजी च्या वतीने उत्कृष्ट उद्योजक महिला बचत गट व सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार

घाटंजी दि. १६ (वार्ता.) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नगर परिषद घाटंजी दिनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापित स्वाभिमानी नारिशक्ती शहर स्तर संघ संस्था, पार्टी यांच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाचा सोहळा आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रममध्ये उत्कृष्ट उद्योजक महिला गटात श्रीमती विजया डेहनकर, श्रीमती नेहा विरदंडे, श्रीमती प्रतिभा पेटकर व श्रीमती शुभांगी राठोड यांचा सत्कार करण्यात आला तसेच उत्कृष्ट बचत गट या गटात विपनहतां महिला बचत गट, सावित्रीबाई महिला बचत गट, बिरसा मुंडा महिला बचत गट यांचा सत्कार करण्यात आला. महिलांना आरोग्याविषयक मार्गदर्शन मिळण्याकरिता डॉ. सोनाली बडोदेकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच विविध क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या महिला म्हणून काजल रोशन प्रदर्शनी भरवली. बिसमोरे, स्वाती भोग, मालाताई बिसमोरे यांचा सत्कार करण्यात आला. शहर स्तर संघाचे अध्यक्ष

अॅड. योगिता पवार, सदस्य कांचन शेंडे, कलाताई पावडे यांनी महिला बचत गटाना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच सोहळ्याच्या शेवट ला विविध विक्री स्टॉल बचत गटांनी लावून बचत गटांची हजर होते. तसेच प्रमुख पाहूने म्हणुन सुषमा खान्डरे, माला बिसमोरे, काजल बिसमोरे, स्वाती भोंग, मार्गदर्शक म्हणून डॉ. सोनाली बडोदेकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक सदानंद आडे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन नवीन देशेट्टियार यांनी केले व तसेच सोनाली आकाश भोयर व सोनाली प्रशांत भोयर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहे. सदर कार्यक्रम माननीय मुख्याधिकारी तथा प्रशासक अमोल माळकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला असून महिला दिनाचा प्रशासक अमोल माळकर कार्यकमाला सोहळ्याला मुख्याधिकारी तथा लाभलेले सन्माननीय मंच म्हणून शहर स्तर संघाचे सर्व सभासद उपस्थित होते.

Copyright ©