यवतमाळ सामाजिक

हिंदू नववर्षाच्या पर्वावर दिग्रस येथे भव्य महारॅलीचे आयोजन

हिंदू नववर्षाच्या पर्वावर दिग्रस येथे भव्य महारॅलीचे आयोजन

हिंदू नववर्षाच्या पावन पर्वावर गुढीपाडव्याच्या दिवशी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज सेवा समिती, दिग्रसच्या वतीने भव्य महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत जास्तीत जास्त भाविक-भक्त व हिंदू बांधवांनी सहभाग नोंदवावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. दि. २२ मार्च रोजी, गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी १० वाजता सदर महारॅली गजानन महाराज मंदिर संस्थान येथून निघणार आहे.

पाश्चात्य संस्कृतीचा पगडा जनमानसावर मोठ्या प्रमाणात असल्याने १ जानेवारीलाच लोक आपला नववर्ष म्हणून समजतात. मात्र हिंदू संस्कृतीप्रमाणे गुढीपाडवा हेच खरे नववर्ष असून अगदी सात्विक आणि पवित्र वातावरणात नूतन नववर्ष साजरा होणे आवश्यक आहे. त्यामुळे स्व- स्वरूप संप्रदाय यवतमाळ पश्चिमच्या दिग्रस तालुका सेवा समितीच्या वतीने भव्य महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविक-भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Copyright ©