यवतमाळ सामाजिक

लिंगायत पाडवा पहाटचे आयोजन

लिंगायत पाडवा पहाटचे आयोजन

(बसव क्लब,वीरशैव हितसंवर्धक मंडळ, वसुधा प्रतिष्ठान,महिला मंडळाचा उपक्रम)

नव्या वर्षी नव्या भेटी, नव्या क्षणाशी नवी नाती,

नवी पहाट तुमच्यासाठी, शुभेच्छांची गाणी गाती!

सूरमयी पाडवा पहाट.., मैफली.. अन् त्यांना दाद देणारे यवतमाळकर.. हे समीकरण अलीकडे चांगलेच दृढ झाले आहे.

यवतमाळच्या सांस्कृतिक वातावरणात भर टाकणार्‍या मैफलींमध्ये लिंगायत पाडवा पहाटचा महत्त्वाचा वाटा आहे. पाडवा पहाट म्हणजे सांस्कृतिक वर्षाची नव्याने सुरुवात करणारा उत्सव. गेल्या काही वर्षांपासून पाडवा पहाट या उपक्रमाला बहर आला आहे. आणि त्याला यवतमाळकरांची उत्स्फूर्त दाद लाभत गेली.

यवतमाळच्या सांस्कृतिक वातावरणात भर टाकणाऱ्या मैफलींमध्ये महत्त्वाचा वाटा लिंगायत पाडवा पहाटचा आहे. पाडवा पहाट म्हणजे सांस्कृतिक वर्षाची नव्याने सुरूवात करणारा उत्सवच. यवतमाळात गेल्या बारा वर्षांपासून लिंगायत पाडवा पहाट या उपक्रमाला बहर आला आहे. पिंपळपाराने खोवलेल्या बीजाचा वटवृक्ष होत चालल्याचा हा पुरावाच आहे.

बसव क्लब,वीरशैव हितसंवर्धक मंडळ, वसुधा प्रतिष्ठान,महिला मंडळ,यवतमाळ द्वारा

शहरात दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी लिंगायत पाडवा पहाटचे आयोजन करण्यात येते. यंदा दरवर्षीप्रमाणे बुधवार दि. २२ मार्चला सकाळी ६:३० वाजता महात्मा बसवेश्वर सांस्कृतिक भवन, यवतमाळ येथे मराठी नववर्ष आणि गुढीपाडवा निमित्ताने प्रातःकालीन संगीतमय मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये लिंगायत समाजातील उद्योन्मुख गायक आणि गायिका भक्तीगीतांचे सादरीकरण करणार आहे,एका पेक्षा एक सरस गाण्यांची हि संगीतमय मैफील ठरणार आहे.

अभुतपूर्व अशी ही साजरी होणारी लिंगायत पाडवा पहाट ही मैफल समाज बांधव रसिकांनी चुकवू नये अशी आहे.आपण सर्वांनी ह्या भक्तीसंगीतमय कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आयोजकांतर्फै कळविण्यात आले आहे.

Copyright ©