यवतमाळ सामाजिक

आम आदमी पार्टीचा कर्मचाऱ्याचा संपाला जाहीर पाठिंबा

प्रतिनिधी/घाटंजी अमोल नडपेलवार

आम आदमी पार्टीचा कर्मचाऱ्याचा संपाला जाहीर पाठिंबा

घाटंजी:- जूनी पेन्शन योजना लागू करण्याच्या‎ मागणीसाठी राज्यातील‎ सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत.‎ तहसील कार्यालय येथे आंदोलन करणाऱ्या सरकारी,‎ निमसरकारी व शिक्षक-शिक्षकेतर‎ कर्मचाऱ्यांची भेट घेत आम आदमी पार्टीचा पदाधिकाऱ्यांनी संपास पाठिंबा दिला.‎ राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक,‎ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबरोबरच नगरपरिषद व अन्य‎ कर्मचाऱ्यांनाही जूनी पेन्शन योजना लागू‎ करण्याची मागणी सरकारला केली आहे.‎ राष्ट्रीय पेन्शन स्कीम (एनपीएस) रद्द‎ करुन जूनी पेन्शन योजना (ओपीएस) लागू‎ करण्याची सरकारी कर्मचारी व शिक्षकांची‎ मागणी आहे. त्यासाठी हे कर्मचारी बेमुदत‎ संपावर गेले आहेत. २००५ पासून सेवेत‎ दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन‎ योजना लागू करण्याची त्यांची प्रमुख मागणी‎ आहे. सध्या नगरपालिका‎ आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत. त्यामुळे वेतन‎ आयोग, नियमित वेतन आणि पेन्शन वेळेवर‎ मिळत नाहीत. त्यामुळे शासकीय कर्मचारी‎ ज्याप्रमाणे कोषागारातून वेतन, पेन्शन घेतात,‎ ती पद्धती लागू व्हावी, आदी मागण्यांसाठी‎ राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे.‎ आम आदमी पार्टीने समर्थन पत्र देऊन संपाला जाहीर पाठिंबा दिला, आम आदमी पार्टीचा जुन्या पेन्शन योजने संदर्भातील सरकारी कर्मचा-यांच्या मागणीला आणि आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा आहे. पंजाबमध्ये निवडणुकीच्या वेळी आम आदमी पक्षाने सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्याच्या आश्वासन दिले होते आणि सत्तेत येताच पंजाबमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा ठराव मंजूर केला. पंजाब, हरियाणा,‎ झारखंड, राजस्थान सरकारने जूनी पेन्शन‎ योजना लागू केली. या पार्श्वभूमीवर राज्य‎ सरकारने कर्मचाऱ्यांना तात्काळ न्याय द्यावा. एकूणच राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतच्या आंदोलनास आम आदमी पार्टी संपूर्ण पाठिंबा आणि समर्थन देत आहे अशा आशयाचे समर्थपत्र देण्यात आले. यावेळी शहर अध्यक्ष अमोल नडपेलवार, सागर समंनवार, ओमप्रकाश डोहळे, दीपक घोलप, पुंडलिक मडावी व समस्त आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Copyright ©