Breaking News यवतमाळ

रांडुकराच्या हल्यात गुराखी गंभीर जखमी

प्रतिनिधी यवतमाळ-पुरुषोत्तम कामठे

रांडुकराच्या हल्यात गुराखी गंभीर जखमी

यवतमाळ:- आल्या दिवसांत राण डुकरांनी कमालीची दहशत निर्माण केलेली आहे.राण डुकरांच्या हल्याचे प्रकरण वाढतीवर असताना आज पुन्हा एक घटना दारव्हा तालुक्यात घडल्याचे पुढे आले.दारव्हा तालुक्यातील गोंडेगाव(हरू) येथील रहिवाशी संजय बाबुराव रुडे हे राणात गाई चारत असताना अचानक राण डुकरांनी हल्ला केला यातगुराखी गंभीर जखमी झाल्याची घटना दुपारी तीन.साडेतीन वाजताच्या दरम्यान घडली आहे.या हल्यात संजय यांच्या पाठीत दात भोकसल्याने गंभीर जख्मी झाल्याचे दिसून आले या घटने दरम्यान संजय ला दारव्हा येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार घेऊन यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे असून उपचार सुरू आहे,या प्रकरणी वनविभागानी या गुरख्यास तातडीने मदत देऊन वन्य प्राण्यांच्या मुक्त संचारास आवर घालावा अशी मागणी केल्या जात आहे

Copyright ©