यवतमाळ सामाजिक

आझाद नारी फाउंडेशन द्वारा आयोजित मोफत भव्य आरोग्य शिबीरास उत्स्फूर्द प्रतिसाद

आझाद नारी फाउंडेशन द्वारा आयोजित मोफत भव्य आरोग्य शिबीरास उत्स्फूर्द प्रतिसाद

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आझाद नारी फाउंडेशन द्वारे भव्य आरोग्य तपासणी शिबिर व महिला महोत्सवाचें आयोजन दिनांक ८ मार्च २०२३ रोजी बोरी अडगाव येथे करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौ. नंदाबाई सुरवाडे, उद्घाटक डॉ.सविता हटकर, प्रमुख पाहुणे-सौ. सीमाताई पाटील, प्रमुख अतिथी- पूजा वाघमारे, काजल सुरवाडे, सुजाता हिवराळे, नाझिया जी शेख, डॉ. सागर देशमुख डॉ.अंकिता खांदे, डॉ. चैताली नेमणार, डॉ.अमोल आढाव, डॉ.वंदना वसुकर, सौ.शारदा टिकार, तसेंच विशेष मान्यवर म्हणून, प्रतिभा सुरवाडे शारदा टिकार, सरला टीकार, शशिकला सुरवाडे, ललिता सुरवाडे, वंदना भस्कर, महानंदा ठोसरे मंगला इंगळे संगीता काटकर, आशा अरज , जयश्री कीर्तने, शहनाज पठाण, सुमनताई खरात , निर्मला बोचरे, हर्षा सुरवाडे, पुजा सुरवाडे. इत्यादी मान्यवर यांचा कार्य गौरव म्हणून सन्मान करण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ बंधू-भगिनी गावातील नागरिक आशा वर्कर अंगणवाडी सेविका मदतनीस महिला बचत गटाच्या अध्यक्ष सचिव सदस्य तसेच विविध सामाजिक क्षेत्राशी निगडित महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. पुढील वर्षा अखेर संस्थेच्या वतीने १०० महिलांना उद्योजक बनवण्याचं उद्देश असून शासनाच्या महिला सक्षमीकरण धोरणाला बळकटी देण्यासाठी लवकरच तालुका स्तरावर प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येईल असें संस्थेचे संचालक राहुल सुरवाडे यांनी सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.पूजा सुरवाडे व कपिल अवचार यांनी केले तर आभार कु.काजल सुरवाडे यांनी मानले!

Copyright ©