यवतमाळ सामाजिक

वसुंधरा फाऊंडेशन व पडवाळे नर्सिग होम यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांचा सत्कार व फॅशन शो उत्साहात संपन्न.

वसुंधरा फाऊंडेशन व पडवाळे नर्सिग होम यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांचा सत्कार व फॅशन शो उत्साहात संपन्न.

यवतमाळ प्रतिनिधी -: यवतमाळमध्ये गेल्या काही वर्षांपासून विविध समाज उपयोगी उपक्रमांसह महिलांसाठी विशेष कार्यक्रम तसेच विवीध स्पर्धांचे आयोजन करणाऱ्या वसुंधरा फाउंडेशनच्या अध्यक्ष वर्षा पडवे यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दिनांक १२ मार्च २०२३ रोजी खास विवाहित महिलांसाठी वेशभूषा स्पर्धेचेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डाॅ.विनोद पडवाळे, विशालजी जाजू,डाॅ.सारिका शहा,डाॅ.नेहा पडवाळे,डाॅ.अंजली गवार्ले,राजीक कुरेशी हे होते.या कार्यक्रमांमध्ये विविध सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या ३० जणांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमांमध्ये पारंपारिक वेशभूषेमध्ये प्रथम क्रमांक अनिता पेंद्राम,अरुणा नेवारे,द्वितीय संगीता जानकर,तर तृतीय सरोज बरदेहे तर वेस्टर्न वेशभूषेमध्ये प्रथम क्रमांक रोहिणी ढोले, द्वितीय क्रमांक सुषमा बेंद्रे,तृतीय क्रमांक छाया चव्हाण यांनी पटकावला.

या वेशभूषा स्पर्धा मध्ये एकूण ३५ जणांनी सहभाग नोंदविला.तसेच या कार्यक्रमांमध्ये आनंद मेळाव्याचे भव्य आयोजन केले असून आपआपल्या क्षेत्रामध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या महिलांचा यावेळी वसुंधरा फाउंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला विहा पडवाळे हिने केलेल्या गणेश वंदनेने झाली.वेशभूषेचे परीक्षणासाठी जज इशिता चित्ते अमरावती,लुबा राजीक, यवतमाळ यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसुंधरा फाउंडेशनचे अध्यक्ष वर्षा पडवे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी कोठेवार यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वसुंधरा फाउंडेशनच्या सचिव स्मिता ढेकळे प्रसाद गायकवाड,सोनसखी ज्वेलर्स यवतमाळ, योगिता मासाळ,निर्मला आडे,नेहा शर्मा,किरण शिरभाते,सुचिता नगोसे,जया सलुजा,तृप्ती मोरे,रुपाली गुल्हाणे,मीनल मेहता,अमृता वढेरा यांनी सहकार्य केले.

Copyright ©