यवतमाळ सामाजिक

सुनिल चव्हाण यांचा सन्मान

सुनिल चव्हाण यांचा सन्मान

स्व. कौशल्याबाई गो.भितकर बहुउद्देशीय शिक्षण संस्था यवतमाळ संचलित सुनिता फॅशन ड्रेस डिझायनिंग अँड म्यानुफ्यकचारींग प्रशिक्षण केंद्र यवतमाळ द्वारा अठरावे वार्षिक स्नेह संमेलन उत्सव मंगल कार्यालय येथे मोठ्या थाटात संपन्न झाला.या सोहळ्यात विविध वृत्त पत्रात लिखाण करणाऱ्या पत्रकार बांधवांचा व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्य वीरांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष कीर्ती चिंतामणी पोलीस अधिकारी ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून फहीम सरकार.इरफान भाई .कीर्ती राऊत.क्रांती धोटे.नंदिनी शिंदे हे होते.पाहुणे मंडळी च्या हस्ते जेष्ठ कलावंत सुनिल रामचंद्र चव्हाण यांचा प्रमाणपत्र व स्मूर्ती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.सुनिल चव्हाण यांनी स्त्री च्या आवाजात गीते गाऊन वाह वाह मिळवली.कार्यक्रमाचे आयोजन सौ.सुनिता भितकर व भगवान भितकर यांनी केले होते .प्रशक्षणार्थी नी एका पेक्षा एक सुंदर अशी नृत्ये सादर करून उपस्थितांची दाद मिळवली

Copyright ©