यवतमाळ सामाजिक

घाटंजी येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी योग्य सेवा देत नसल्याची तक्रार

प्रतिनिधी/घाटंजी अमोल नडपेलवार

घाटंजी येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी योग्य सेवा देत नसल्याची तक्रार

घाटंजी.ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांना योग्य सेवा मिळत नसल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते मधुकर निस्ताने यांनी मा. अधिष्ठाता साहेब, जिल्हा रुग्णालय, यवतमाळ यांचे कडे केली आहे.

केलेल्या तक्रारीत त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी. असेही नमूद केले आहे.

आरोपांमध्ये त्यांनी,वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे अपडाऊन करणे, उशिरा येणे, लवकर निघून जाने इ. रूग्णालयात आरोग्यासाठी घ्या योजना ची माहिती दिली जात नाही, रक्ततपासणी तर विलंब, एक्स रे फी, विवाह नोंदणी व प्रमाणपत्र चा घोळ, डिलेव्हरीचा रुग्णांना, अपघात,व वन्यप्राणी हल्ला इत्यादी पेशंट हमखास यवतमाळ येथे रेफर केला जातो, प्राथमिक उपचार पण केला जात नाही, सरकारी ॲम्ब्युलन्स पेक्षा संस्थेच्या ॲम्ब्युलन्स ची सेवा लवकर उपलब्ध करून दिली जाते, त्यामुळे पेशंट ला पेट्रोल व ड्रायव्हर खर्च म्हणून भाडे वसूल केले जाते व जास्तीत जास्त पेशंट ला हमखास प्रायव्हेट दवाखान्यात भरती होण्यासाठी प्रयत्न केला जातो कारण कमीशन लुटण्याचा धंद्यात कर्मचाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता आहे.

रिटायर कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण करुण कमीशन खाने, रुग्णालयातील खर्च व बांधकाम खर्च यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे, तक्रारींवर कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Copyright ©