यवतमाळ सामाजिक

भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा सौ. चित्राताई वाघ यांची हिंगणघाट येथे आढावा बैठक

प्रतिनिधी हिंगणघाट पंकज तडस

भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा सौ. चित्राताई वाघ यांची हिंगणघाट येथे आढावा बैठक

 

भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा सौ. चित्राताई वाघ यांनी काल सोमवार रोजी हिंगणघाट येथे भेट दिली.

 

महिला दिनाचे औचित्य साधून आमदार समीर कुणावार यांचे जनसंपर्क कार्यालयात भाजपा महिला मोर्चाचे पदाधिकारी तसेच सर्व महीला सदस्यांची भेट घेतली. याप्रसंगी महिला आघाडीच्या प्रदेश पदाधिकारी माया उमाटे, जिल्हाध्यक्षा वैशाली येरावार, प्रा. उषाकिरण थुटे, शहर अध्यक्ष अनिता मावळे, छाया सातपुते, पुष्पा सोनटक्के, समिक्षा मांडवकर, शारदा आंबटकर, श्रद्धा ताई कुणावार, इत्यादी मान्यवर महिला उपस्थित होत्या.

यावेळी श्रीमती चित्राताई वाघ यांनी नुकत्याच गठीत करण्यात आलेल्या भाजपा महिला आघाडीच्या कार्यकारिणीचा आढावा घेतला. महिला आघाडीच्या सर्व सदस्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत त्यांच्या अडीअडचणीही जाणून घेतल्या.

महिला आघाडीच्या सर्व सदस्य व पदाधिकऱ्यांनी पक्षबांधणीकरीता सदैव प्रयत्नशील राहावे, असे आवाहन श्रीमती वाघ यांनी यावेळी केले. कार्यक्रमादरम्यान शहरातील सुप्रसिध्द स्त्रिरोगतज्ञ डॉ. प्रणाली सायंकार यांचा चित्राताई वाघ यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.

आयोजीत कार्यक्रमाचेवेळी हिंगणघाट शहर तसेच ग्रामीण,समुद्रपुर, सिंदि(रेल्वे) येथील पदाधिकारी, सर्व महीला नगरसेविका, जिल्हा परीषद तथा ग्रा.प., पंचायत समिती सदस्या, महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या मोठया संख्येने हजर होत्या.

Copyright ©