यवतमाळ सामाजिक

दिग्रस ते छत्रपति संभाजीनगर जाणाऱ्या बसला केले थाटात रवाना

दिग्रस ते छत्रपति संभाजीनगर जाणाऱ्या बसला केले थाटात रवाना

धर्मवीर छत्रपती संभाजी राजेंच्या मावळ्यांनी बस चालक व वाहकांचा केला शाल श्रीफळ देऊन सत्कार

महाराष्ट्राचे नवीन शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर बऱ्याच योजनांना बळ देत सुरुवात केली तात्काळ निर्णय घेणे अशी या सरकारची ओलख निर्माण होत आहे. नुकतेच महाराष्ट्र शासनाने दोन जिल्ह्याची नावे बदलण्याचा निर्णय घेतला होता त्यात १) उस्मानाबाद चे धाराशिव व दुसरे म्हणजे औंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करण्यात आले. महाराष्ट्रातील उस्मानाबाद या गावी दिग्रस आगारातून बस सेवा नव्हती मात्र दिग्रस -औरंगाबाद बस सेवा अविरत चालू होती. शिंदे सरकार नी महाराष्ट्रातील दोन जिल्ह्याची नावे बदलण्याचा निर्णय घेतला आणि औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर या नावाने नामांतरन केल्या गेले. याच आनंदात दिग्रस येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मावळ्यांचा आनंद दृगोनित झाला. हा उत्साह अतिउत्साहीत होऊन आतिषबाजी न करता एक आगळा वेगळा उपक्रम राभविण्याचा या मावळ्यांनी निर्णयघेत.व बसआगारात जाऊन दिग्रस ते छत्रपति संभाजीनगर या बसचे शेकडोच्या संख्येत कार्यकर्त्यांनी थाटामाटात जल्लोषात हारतुर्यांने सजवून भगवे झेंडे लावून या बसला संभाजीनगर या दिशेने रवाना केले. यावेळी या बसचे वाहक आणि चालक यांचा सुद्धा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमर नरोडे, बाबू ढाले, प्रशांत बोरकर, नितीन रहाटे, संकेत दातीर, मनोज घाडगे, श्रीकांत राठोड, अजय काळबांडे, रवी झाडे, प्रमोद ढोण, बालाजी अर्बन बँकेचे सर व्यवस्थापक श्याम लोखंडे, अश्विन शिंदे, तानाजी, बंटी भलगे सह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते

Copyright ©