Breaking News यवतमाळ

प्रहार च्या नगर सेवकांचा खून

प्रहार च्या नगर सेवकांचा खून

बाभूळगाव नगर पंचायत नगरसेवक अनिकेत गावंडे यांची धारधार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव येथे घडली, काल मध्यरात्रीच्या दरम्यान रेतीच्या पैशाच्या वादातून हत्या झाल्याची माहिती समोर आलीआहे. या प्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अनिकेतची पार्श्वभूमी हि गुन्हेगारी स्वरूपाची होती. त्यानंतर त्याने रेती व्यवसायात बाभूळगाव तालुक्यात पाय रोवले व सोबतच लोकप्रियता हि मिळवली नंतर प्रहारकडून नगरपंचायत निवडणूक लढून निवडून आला होता.मात्र व्यावसायिक कार्य चालूच असल्याने दिवसेंदिवस पारडे जड होत होते यातच अचानक अनिकेतच्या हत्येने बाभुळगावात खळबळ उडाली

रेतीच्या वादातून हत्येची शक्यता वर्तविली जाऊ लागली

नदी तिथं रेती व्यवसाय. या रेती व्यवसायात मोठा नफा मिळतो. त्यातून श्रीमंती लवकर येते, असा काहींचा समज आहे. त्यामुळे रेती व्यवसायात तरुनाचा कल या व्यावसायाकडे जास्त होत असल्याचे पहावयास मिळत आहे,यातूनच वैर पण जास्त वाढत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या, या तालुक्यात रेती व्यावसायाची खूप स्पर्धा आहे. या स्पर्धेतून वाद-विवाद सतत होत असतात. असाच काहीचा वाद अनिकेतच्या बाबतीत झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यातून अनिकेतचा जीव गेला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे .

कोण आहे अनिकेत?

अनिकेत हा गुन्हागारी पार्श्वभूमी असलेला युवक. त्याने पैसे कमवण्यासाठी रेती व्यवसायात प्रवेश केला. रेती व्यवसायातून पैसे कमवल्यानंतर अनिकेतने राजकारणात प्रवेश केला. बाभूळगावात नगरपंचायत निवडणूक लढली. त्यात तो विजयी झाला. त्यामुळे राजकीय वलय वाढले होते. पण, काल रात्री अचानक अनिकेतवर शस्त्राने वार करण्यात आले. त्यात अनिकेतचा जीव गेला.

 

अनिकेतच्या मृत्यूला जबाबदार कोण?

याचा तपास आता पोलीस करत आहेत. फार कमी वयात त्याने यश मिळवले होते. पण, शेवट अतिशय वाईट झाला. रात्री घडलेल्या या थरार कृत्याने समाज मन हेलावले या घटनेमुळे बाभुळगावात खळबळ माजली आहे. अनिकेतचे विरोधक कोण होते, याचा पोलीस शोध घेत आहे, या हत्ये मागे मास्टर माईंड कोण असाही सवाल करण्यात येत असून हि हत्या नेमकी का करण्यात आली हे अजूनही कळले नाही.

Copyright ©