यवतमाळ सामाजिक

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या आठवणीत पाळल्या जातो बलिदान मास

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या आठवणीत पाळल्या जातो बलिदान मास

‘देशासाठी शहीद झालेल्या युद्धवीरांना जनता विसरली आहे’, अशी चर्चा अनेकदा जनमानसात एकव्यात येत असते. मात्र पण पूर्णपणे खरे नाही. खरं तर, धर्म अभिमानांनी आपल्या शूर योद्धा शहिदांचे स्मरण करण्यासाठी अनोखी परंपरा विकसित केली आहे. उदाहरणार्थ, महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या परिसरात एक अनोखी परंपरा आहे, ज्या अंतर्गत लाखो लोक आपल्या शूर राजाच्या स्मरणार्थ महिनाभर आपले सर्व सुख आणि छंद सोडून देतात. नित्य पूजन करुन, धर्मासाठी झुंजावे झुंझुनी अवघ्यासी मारावे मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले: या मंत्राचा उच्चार करतात.

थोर मराठा जाणता राजा छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे पुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांच्या स्मरणार्थ सुरू झालेली ही अनोखी परंपरा गेली अनेक दशके सुरू असल्याची कथा आहे. वास्तविक धर्मवीर छत्रपती संभाजी राजेंना कपटाने कैदी बनवल्यानंतर क्रूर मुघल शासक औरंगजेबाने त्यांच्यावर महिनाभर छळ करून त्यांची हत्या केली होती. तेव्हा मराठा साम्राज्यातील सैनिक आणि सामान्य जनता आपल्या राजासाठी तळमळत होती, परंतु त्या वेळी ते मुघलांच्या क्रूर सैन्याविरुद्ध लढण्याच्या स्थितीत नव्हते. म्हणूनच वीर संभाजींच्या मृत्यूची हृदयद्रावक वेदना प्रत्येक मराठा पुरुष, स्त्री आणि मुलाच्या मनात घर करून गेली. धर्मवीर छत्रपती संभाजीराजे जोपर्यंत औरंगजेबाच्या कैदेत होते तो पर्यंत त्यांच्यावर अत्याचार केला गेला. तो कालावधी सुमारे एक महिन्याचा होता. तोपर्यंत लोकांनी आपले सर्व छंद आणि आनंद सोडून देण्याची परंपरा बनवली होती.

 

1689 मध्ये संभाजी राजेंच्या मृत्यूनंतर सुरू झालेली ही परंपरा आजतागायत सुरू आहे. या एक महिन्याच्या कालावधीत वीर संभाजींच्या स्मरणार्थ महाराष्ट्रातील लोक आणि मराठा साम्राज्याखालील भागात आजही कठोर तपश्चर्या करतात. श्रद्धांजली म्हणून, ते त्यांच्या कोणत्याही आवडत्या गोष्टी सोडतात. उदाहरणार्थ,चहा पिणे, मिठाई खाणे, पायात चप्पल न घालणे, दिवसातून एकदाच खाणे, व्यसन सोडणे, आनंद साजरा न करणे, मुंडण करणे, दूरदर्शन न पाहणे इत्यादी संकल्प करतात. जो संकल्प घेतो, तो महिनाभर प्रत्येक परिस्थितीत मनापासून पूर्ण करतो. खरे तर धर्मवीर छत्रपती संभाजी राजेंचे स्मरण करण्याचा हा लोकजीवनाचा मार्ग आहे. आपल्या वीरांचे स्मरण करण्याची अशी अनोखी परंपरा जगात कोठेही नाही.

Copyright ©