यवतमाळ सामाजिक

आर. एस. के.स्पोर्टस ॲकेडमीतर्फे आयोजित क्रीकेट लिगमध्ये वकिल संघ विजेता तर आयएमए उपविजेता

आर. एस. के.स्पोर्टस ॲकेडमीतर्फे आयोजित क्रीकेट लिगमध्ये वकिल संघ विजेता तर आयएमए उपविजेता

यवतमाळ : शहरात नव्‍यानेच सुरू झालेल्या आर.एस.के स्पोर्टस ॲकेडमी श्रोती हास्पीटलजवळ दत्त चौक यवतमाळच्यावतीने आयोजित फ्रेंडली TURfक्रीकेट लिगमध्ये ॲडव्‍होकेट ७ संघाने बाजी मारली तर उपविजेता आयएमएचा संघ ठरला. १२ मार्च रोजी झालेल्या क्रिकेट लिग सामन्यामध्ये ॲडव्‍हॉकेट ७, इंडियन मेडिकल असोसिएशन यवतमाळ, यवतमाळ केमिस्ट ॲण्ड ड्रगीस्ट असोसिएशन यवतमाळ, आर्किटेक्ट असोसिएशन यवतमाळ, सीए असोशियन यवतमाळ, पोलिस दल एसपी ७, इंडियन डेंटल असोसिएशन, नॅशनल इंटीग्रेटेड मेडिकल असोसिएशन आदी संघ सहभाग नोंदवून क्रीकेट लिगचे 8 ओव्‍हरचे सामने यशस्वी केले. या सामन्यामध्ये ॲडव्‍हॉकेट ७ चे ॲड. विशाल गणात्रा हे मॅन ऑफ मॅच तर आयएमएचे डॉ. भुषण अंभारे मॅन ऑफ द सिरीज ठरले. सुरुवातीला क्रीकेट लिग सामन्याचे उदघाटन गोलंदाजी करीत सुप्रसिध्द उद्योजक सागरमल प्रेमराजजी कोठारी यांनी केले. याप्रसंगी ॲडव्‍हॉकेट ७ चे कर्णधार ॲड. वरुण भूतडा, आयएमएचे कर्णधार डॉ. सुबोध तिखे, यवतमाळ केमिस्ट असोसिएशनचे कर्णधार पंकज नानवाणी, आर्किटेक्ट असोसिएशनचे कर्णधार सुहास पुरी, सीए असोसिएशनचे कर्णधार गिरीष बख्तियार, पोलिस दल एसपी ७चे कर्णधार ॲडीशनल एसपी पियुष जगताप, डेंटल असोसिएशनचे कर्णधार निखिल मानकर, निमा संघटनेचे कर्णधार शैलेश यादव आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. पंच म्हणून राजुभाऊ टेंभरे, स्कोअरर म्हणून प्रथमेश साखरे, सामन्याचे संचलन अमित नानेटकर यांनी केले. याप्रसंगी विजयी व उपविजेता संघाला ट्रॉफी व सर्व खेळाडूंना गोल्ड मेडल तसेच मॅन ऑफ द मैच, मॅन ऑफ द सिरीज ची ट्रॉफी सुप्रसिध्द उद्योजक सागरमल कोठारी यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले. याप्रसंगी सामन्याच्या यशस्वीतेसाठी कुलदिप कोठारी, डॉ. पियुष बरलोटा, पंकज नानवाणी, प्रमोद नानवाणी, डॉ. अतुल पाटील, डॉ. अमर सुरजूसे, डॉ. वैभव चक्करवार, आदींनी अथक परिश्रम घेतले. विशेष म्हणजे दुपारी ४ वाजतापासून सुरू झालेले क्रिकेट लिगचे सामने रात्री १० पर्यंत अविरतपणे सुरू होते. क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित दर्शविली. तसेच आर.एस. के ॲकेडमीने शहराच्या मध्यवस्तीत खेळण्यासाठी खेळाडूंना अतिशय सुंदर क्रीडांगण उपलब्ध करुन दिल्याबद्दल समाधान व्‍यक्त केले. स्पोर्टस ॲकेडमीतर्फे आयोजित क्रीकेट लिगमध्ये वकिल संघ विजेता तर आयएमए उपविजेता

यवतमाळ : शहरात नव्‍यानेच सुरू झालेल्या आर.के.एस. स्पोर्टस ॲकेडमी श्रोती हास्पीटलजवळ दत्त चौक यवतमाळच्यावतीने आयोजित फ्रेंडली TURI क्रीकेट लिगमध्ये ॲडव्‍होकेट ७ संघाने बाजी मारली तर उपविजेता आयएमएचा संघ ठरला. १२ मार्च रोजी झालेल्या क्रिकेट लिग सामन्यामध्ये ॲडव्‍हॉकेट ७, इंडियन मेडिकल असोसिएशन यवतमाळ, यवतमाळ केमिस्ट ॲण्ड ड्रगीस्ट असोसिएशन यवतमाळ, आर्किटेक्ट असोसिएशन यवतमाळ, सीए असोशियन यवतमाळ, पोलिस दल एसपी ७, इंडियन डेंटल असोसिएशन, नॅशनल इंटीग्रेटेड मेडिकल असोसिएशन आदी संघ सहभाग नोंदवून क्रीकेट लिगचे 8 ओव्‍हरचे सामने यशस्वी केले. या सामन्यामध्ये ॲडव्‍हॉकेट ७ चे ॲड. विशाल गणात्रा हे मॅन ऑफ मॅच तर आयएमएचे डॉ. भुषण अंभारे मॅन ऑफ द सिरीज ठरले. सुरुवातीला क्रीकेट लिग सामन्याचे उदघाटन गोलंदाजी करीत सुप्रसिध्द उद्योजक सागरमल प्रेमराजजी कोठारी यांनी केले. याप्रसंगी ॲडव्‍हॉकेट ७ चे कर्णधार ॲड. वरुण भूतडा, आयएमएचे कर्णधार डॉ. सुबोध तिखे, यवतमाळ केमिस्ट असोसिएशनचे कर्णधार पंकज नानवाणी, आर्किटेक्ट असोसिएशनचे कर्णधार सुहास पुरी, सीए असोसिएशनचे कर्णधार गिरीष बख्तियार, पोलिस दल एसपी ७चे कर्णधार ॲडीशनल एसपी पियुष जगताप, डेंटल असोसिएशनचे कर्णधार निखिल मानकर, निमा संघटनेचे कर्णधार शैलेश यादव आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. पंच म्हणून राजुभाऊ टेंभरे, स्कोअरर म्हणून प्रथमेश साखरे, सामन्याचे संचालन अमित नानेटकर यांनी केले. याप्रसंगी विजयी व उपविजेता संघाला ट्रॉफी व सर्व खेळाडूंना गोल्ड मेडल तसेच मॅन ऑफ द मैच, मॅन ऑफ द सिरीज ची ट्रॉफी सुप्रसिध्द उद्योजक सागरमल कोठारी यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले. याप्रसंगी सामन्याच्या यशस्वीतेसाठी कुलदिप कोठारी, डॉ. पियुष बरलोटा, पंकज नानवाणी, प्रमोद नानवाणी, डॉ. अतुल पाटील, डॉ. अमर सुरजूसे, डॉ. वैभव चक्करवार, आदींनी अथक परिश्रम घेतले. विशेष म्हणजे दुपारी ४ वाजतापासून सुरू झालेले क्रिकेट लिगचे सामने रात्री १० पर्यंत अविरतपणे सुरू होते. क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित दर्शविली. तसेच आर.के.एस. ॲकेडमीने शहराच्या मध्यवस्तीत खेळण्यासाठी खेळाडूंना अतिशय सुंदर क्रीडांगण उपलब्ध करुन दिल्याबद्दल समाधान व्‍यक्त केले.

Copyright ©