Breaking News यवतमाळ

दिग्रस तालुक्यातील आष्टा येथील शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या

दिग्रस/प्रतिनिधी

दिग्रस तालुक्यातील आष्टा येथील शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या

तालुक्यातील आष्टा येथील एका २८ वर्षीय शेतकरीपुत्राने आपल्या राहत्या घरी घरातील आड्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना आज दि. १२ मार्च २०२३ रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.

सविस्तर वृत्त असे की, आष्टा येथील शेतकरीपुत्र दीपक पुरणलाल सहदेव (वय-२८) याने आपल्या राहत्या घरी आड्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे परिवारातील सदस्यांच्या निदर्शनास आले. फिर्यादी पुरणलाल सखरु सहदेव यांच्यावर खाजगी बँकेचे कर्ज होते.शेती कोरडवाहू असल्याने सतत होणाऱ्या नापिकीमुळे कर्जाची परतफेड करता आले नाही. कर्ज भरण्यासाठी बँकेच्या वसुली नोटीस, पैसे भरण्याकरिता सतत फोन मुलगा दिपकला येत होते. नेहमी तो तनावात व घरामध्ये चिडचिडपणा करत होता. सकाळी घरातील सर्व जण झोपेतून उठले असता दिपकच्या खोलीचा दरवाजा बंद असल्याने त्याला आवाज दिला. मात्र त्याच्या खोलीमधुन कोणताच आवाज येत नसल्याने दरवाजा तोडला असता दिपकने घराच्या आड्याला साडीने फासी घेतल्याचे उघडकीस आले.त्यावरून दिग्रस पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणले व शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.त्याच्या पश्चात पत्नी, मुलगी,आई, वडील,भाऊ असा परिवार आहे.या प्रकरणी दिग्रस पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©