यवतमाळ शैक्षणिक

अमोलकचंद विधी महाविद्यालयात “आंतरराष्ट्रीय महिला दिन” निमित्त “महिला सक्षमीकरण” या विषयावर चर्चासत्र आयोजित

अमोलकचंद विधी महाविद्यालयात “आंतरराष्ट्रीय महिला दिन” निमित्त “महिला सक्षमीकरण” या विषयावर चर्चासत्र आयोजित

यवतमाळ : अमोलकचंद विधी महाविद्यालयातील अंतर्गत तक्रार समिती (ICC) आणि IQAC तर्फे बुधवार 8 मार्च 2023 रोजी “आंतरराष्ट्रीय महिला दिन” निमित्त “महिला सक्षमीकरण” या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य सुप्रभा यादगीरवार होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हाधिकारी सविता चौधर आणि मंगला माळवी, प्रसिद्ध उद्घोषिका आकाशवाणी, यवतमाळ तसेच अंतर्गत तक्रार समितीच्या अध्यक्ष प्रा.अंजली दिवाकर मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये सुरुवातीला संत गाडगेबाबा आणि सावित्रीबाई फुले यांचे फोटोला माल्यार्पण करण्यात आले. सर्व महिला प्राध्यापक यांना भेटवस्तू व पुष्पगुच्छ देउन सन्मानित करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व सांगतांना प्रथम आपल्या घरातील मुलींचा व महिलांचा सन्मान व आदर केला पाहिजे असे आवाहन उपस्थित विद्यार्थांना केले प्रथम मंगला माळवी यांनी महिलांना मार्गदर्शन केले व महिलांना कार्यालयीन स्थळी होणारा लैंगिक छळ या विषयावर मार्गदर्शन केले व महिलानी आर्थिक सामाजिक, व मानसिक सक्षम व्हावे. त्यानंतर सविता चौधर यांनी महिलांना मार्गदर्शन करतांना म्हणाले कि, ‘महिलांनी प्रथम स्वतावर प्रेम करावे, तरच तुम्ही दुसऱ्यावर प्रेम करू शकणार” प्राचार्या सुप्रभा यादगीरवार यांनी महिलांना मार्गदर्शन करतांना ‘महिला व पुरुष एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत, स्त्री विकसित झाली तर समाजाला हातभार लागतो आणि पुरुष जरी विकसीत झाला तरी समाजाला हातभार लागतो. महिला सक्षमिकरणासंदर्भात अतिथींनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून भुमिका मांडली. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. संचालन व आभार प्रा. वैशाली फाळे ह्यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी. प्रा. डॉ. विजेश मुनोत, प्रा. डॉ. संदिप नगराळे, प्रा. वैशाली फाळे, प्रा. स्वप्नील सगणे, प्रा. छाया पोटे, प्रा. अंजली दिवाकर, प्रा. वंदना पसारी, अड विजया चौधरी, अक्षिता जैस्वाल, सुचिता ढेरे, कविता आगरकर, मनोज गौरखेडे, स्वाती मॅडम यांनी परिश्रम घेतले. या प्रसंगी शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Copyright ©