यवतमाळ सामाजिक

कुणबी-मराठा समाजातील विधवा-विधुर घटस्फोटितांच्या पुनर्विवाह परिचय मेळाव्यासाठी सभा संपन्न

तालुका प्रतिनिधी दिग्रस

कुणबी-मराठा समाजातील विधवा-विधुर घटस्फोटितांच्या पुनर्विवाह परिचय मेळाव्यासाठी सभा संपन्न

महात्मा ज्योतिबा फुले यांचा आदर्श घेऊन लक्ष्मण टेकाळे यांनी मांडली विधवा-विधुर पुनर्विवाह संकल्पना

मानवी जीवन जगत असताना प्रत्येक कुटुंबामध्ये सुखदुःखाचा डोंगर कधी कोसळेल याची कुठलीही कुणालाही शाश्वती नाही. सुख-दुःखाचा डोंगर कसा असेल हाही निश्चित नसतो कारण कोणतेही अनुकूल घटना किंवा प्रतिकूल असो कोणत्या वेळ कशी येईल याचा नेमही नसतो असे मानवी जीवन असल्याने समाज व्यवस्थेमध्ये संसारिक जीवनाचा गाडा हागताना पती-पत्नी संसारिक गाड्याचे महत्त्वाचे दोन्ही चाके असून या दोन्ही चाकापैकी वैचारिक मतभेदातून किंवा कौटुंबिक कलाहातून पती-पत्नींचा झालेला घटस्फोट किंवा एखाद्या विपरीत घटनेने पुरुषाला मिळालेलं विधुरत्व किंवा विधवा झालेल्या महिलेकडे सामाजिक दृष्टिकोनातून या घटकांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे. उर्वरित आयुष्य जगत असताना निराशाला समोरे जावे लागते त्यामुळे विधवा विधुर किंवा घटस्फोटीतांना

सुद्धा या नैराश्यातून पुढील आयुष्य नियमित कुटुंबासारखे जगता यावे यासाठी महात्मा फुले यांनी या बाबीवर कार्य केले या कार्याचा आदर्श आज हि या धकाधकीच्या काळात जिवंत ठेवणे काळाची गरज ओळखून. लक्ष्मण टेकाळे यांच्या कल्पनेतून मागील वर्षीपासून विधवा-विदुर घटस्फोटीतांचा पुनर्विवाह परिचय मेळाव्याचे आयोजन दिग्रस येथे राष्ट्रमाता जिजामाता सांस्कृतिक भवन येथे घेण्यात येतो. त्याचप्रमाणे याही वर्षी कुणबी- मराठा समाजाचे विधवा विधुर घटस्फोटितांसाठी पुनर्विवाह परिचय मेळाव्याची सहविचार सभा राष्ट्रमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन येथे नुकतीच घेण्यात आली त्यामध्ये २ एप्रिल 2023 रोजी कुणबी मराठा समाजातील विधवा विधुर घटस्फोटीत यांचा पुनर्विवाह परिचय मेळाव्याचे निश्चित करण्यात आले.या सहविचार सभेमध्ये सर्व शाखेय कुणबी मराठा समाजाचे पदाधिकारी राहुल शिंदे, सुधीर देशमुख, दुर्गादास,रवींद्र आडगळे, गायकवाड, गिरीश साबळे, गिरीश बर्डे ,सुनील लबडे, लक्ष्मण टेकाळे, राजू ठाकरे, गोविंद गावंडे, राजू मस्के, अनिल पवार, सचिन कोरडे, सुरेश झोळ, प्रशांत झोळ ,गजानन गोटे, सदानंद देशमुख ,महादेव वानखडे,या सह ईतर कार्यक्रते उपस्थित होते

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©