यवतमाळ सामाजिक

श्री क्षेत्र रिद्धपूर काशी येथे श्री चक्रधर स्वामी मराठी भाषा विद्यापीठ सुरू करनार

श्री क्षेत्र रिद्धपूर काशी येथे श्री चक्रधर स्वामी मराठी भाषा विद्यापीठ सुरू करनार

अर्थसकल्पीय घोषणा

महानुभाव पंथातील आनंदउत्सव

श्री क्षेत्र रिद्धपूर काशी येथे श्री चक्रधर स्वामी मराठी भाषा विद्यापीठ सुरू करण्याचा अर्थसंकल्पातील घोषणेने मराठी मान उंचावली आहे या घोषणामुळे मराठीचा मान सन्मान व स्वाभिमान वाढविणाऱ्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे महानुभाव अनुयायाकडून आभार व्यक्त करण्यात येत आहे रिद्धपूर हि मराठीची काशी असून इथेच मराठीचा उगम झाला ही बाब वेळोवेळी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली यावेळी अविनाश भाऊ ठाकरे नागपूर आचार्य श्री कारंजेकर बाबा अमरावती, महंत श्री वाईंदेशकर बाबा रिद्धपूर व रिद्धपूरातील सर्वच संत महंत पुजारी वर्गाने सतत या महान कार्याचा पाठ पुरावा केला,आणि त्यांच्या या प्रयत्नाला प्रमेसवर कृपेने भरभरून यश आले,त्या मुळे पांथियान मध्ये आनंद वेक्त करण्यात येत आहे. म्हणूनच यवतमाळ जिल्ह्यातील आचार्य श्री लाड बाबाजी हरसुल आचार्य संन्यासी बाबा उमरखेड, म. श्री धनंजय दादा पंजाबी जामवाडी म. श्री रविराज बाबा शास्त्री यवतमाळ म. श्री गोविंदराज बाबा रिद्धपूरकर जवळा व जिल्ह्यातील महानुभाव पंथीय, सदभक्तांनी सर्वांचे मनःपूर्वक महाराष्ट्र शासनाचे व या महान कार्यात प्रत्येक्ष- अप्रत्यक्ष हातभार लावला या सर्वांचे अभिनंदन करण्यात आले. रिद्धपूर हे मराठीचे विद्यापीठ व्हावे अशी समस्त अनुयायांनी मनस्वी नीच्छय केला होता,याकरिता ज्यांनी प्रयत्न केले त्यांचेही आभार या वेळी वेक्त करण्यात आले. आज हे प्रयत्न माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून पूर्ण होत आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्य शासनाचे महानुभाव पंथीय अनुयायाकडून अर्थसंकलपीय निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे

Copyright ©