यवतमाळ सामाजिक

डॉ. अंजली गवार्ले यांचे इंटरनॅशनल कोलोप्रोक्टॉलॉजी कॉन्फरन्स ईजिप्त येथे व्याख्यान

डॉ. अंजली गवार्ले यांचे इंटरनॅशनल कोलोप्रोक्टॉलॉजी कॉन्फरन्स ईजिप्त येथे व्याख्यान

यवतमाळ येथील सुप्रसिद्ध गवार्ले हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. अंजली गवार्ले यांचे २ ते ३ मार्च २०२३ रोजी कायरो ईजिप्त येथे मेडेटेरियन सोसायटी ऑफ कोलोप्रोक्टॉलॉजी यांनी आयोजित केलेल्या इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये सहभाग घेतला. या कॉन्फरन्स मध्ये यवतमाळ येथील डॉ. अंजली गवार्ले ह्या एकमेव स्त्री आयुर्वेद ॲनाेरेक्टल सर्जन यांनी क्षारसुत्र पद्धतीने अॅनोरेक्टल डिस ऑर्डर म्हणजे मुळव्याध, भगंदर, फिशर व ईतर गुदभागाचे विकार या विषयावर सखोल असे मार्गदर्शन करुन उपस्थितांचे मने जिंकली. यवतमाळकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे. संपुर्ण भारतातून या इंटरनॅशनल कोलोप्रोक्टॉलॉजी कॉन्फरन्ससाठी ४ डॉक्टरांनी सहभाग घेतला होता. त्या मध्ये यवतमाळ येथील डॉ. अंजली गवार्ले, मुंबई येथील डॉ. महेश सांगवी, नागपूर येथील डॉ. प्रविण गुप्ता तसेच भिलाई डॉ. के. व्ही. एस. राव यांनी सहभाग नोंदविला होता. विशेष म्हणजे गवार्ले हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. अंजली गवार्ले यांनी गेल्या १२ वर्षापासून यवतमाळ येथील सर्व सामान्य महिला रुग्णांना अविरतपणे सेवा दिलेल्या आहेत.

यवतमाळ येथील एकमेव स्त्री मुळव्याध, भगंदर तज्ञ म्हणून डॉ. गवार्ले यांची ख्याती आहे. डॉ. अंजली गवार्ले यांचा यवतमाळ शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक, संस्थांशी व्यापक जनसंपर्क असून विशेष म्हणून लिनेस क्लब यवतमाळ, इनरव्हील क्लब यवतमाळ, अस्तित्व फाऊंडेशन यवतमाळ, वसुंधरा फाऊंडेशन यवतमाळ, अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलन यवतमाळ, सिंहझेप समर्पण सखी यवतमाळ, रोटरी क्लब यवतमाळ आदि संस्थांशी जनसंपर्क आहे. या अगोदर डॉ. अंजली गवार्ले यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. मेडीक्विन मिसेस महाराष्ट्र डॉ. अंजली गवार्ले यांनी यावर्षी मेडिक्विन वुमेन्स हेल्थ मोटोच्या अंतर्गत कॅन्सर अवेअरनेस प्रोग्रामचे विशेष आयोजन केले आहे. त्यांना स्त्री रत्न पुरस्कार, आयुर्वेद गौरव, महाराष्ट्र आयडल अशा अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नुकतेच त्याच्या त्यांचे माध्यमातून यवतमाळचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदविले गेले. स्त्रीयांच्या पाईल्स, भगंदर या आजाराची सर्वाधिक शस्त्रक्रिया केल्याचा विक्रम डॉ. अंजली गवार्ले यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड स्थापित केला.

इंटरनॅशनल कोलोप्रोक्टॉलॉजी कॉन्फरन्स येथून डॉ. अंजली गवार्ले यवतमाळ मध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचे निमा वुमेन्स विंगच्या महिला डॉक्टरांनी पुष्गुच्छ, सन्मान चिन्ह देऊन जागतिक महिला दिनानिमित्त त्यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. विशेष म्हणजे संपूर्ण भारतातून इंटरनॅशनल कोलोप्रोक्टॉलॉजी कॉन्फरन्स मध्ये एकमेव महिला प्रतिनिधी म्हणून डॉ. अंजली गवार्ले यांनी सहभाग नोंदविल्या बदल विविध महिला संघटनांच्या वतीने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Copyright ©