यवतमाळ सामाजिक

लाडखेड शाळेत महिला मेळावा उत्साहात साजरा

लाडखेड शाळेत महिला मेळावा उत्साहात साजरा

लाडखेड शाळेत महिला मेळावा उत्साहात साजरा विधवा प्रथा बंदी जनजागृती माता पालकांचा उपस्थितीत उच्चांक  विविध खेळ स्पर्धचे आयोजन लाडखेड अंसार खान- १० मार्च. पं.स.दारव्हा अंतर्गत जि.प.प्रा.म.केंद्र शाळा लाडखेड येथे आधुनिक काळाची माता सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधुन महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी शाळेतील पटावरील २२६ विद्यार्थ्यांच्या माताना निमंत्रण देण्यात आले त्यापैकी १७५ माता उपस्थित राहुन *माता पालकांनी उपस्थितीचा उच्चांक गाठला.

यावेळी महाराष्ट्र शासन निर्णय विधवा प्रथा बंदी चे वाचन करून मार्गदर्शन करण्यात आले.व ग्रामपंचायत सदस्य शितल तायडे यांना शासन निर्णय प्रत देण्यात आली.

कार्यक्रमा दरम्यान विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचे बक्षीस वितरण शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेत प्रथम बक्षीस सौ.सुजाता चव्हाण,सौ.अरुणा तायडे,सौ.किरण घोडे तर द्वितीय बक्षीस सौ. बबीता राऊत,सौ.वर्षा तायडे,सौ.रेश्मा हटवार यांनी पटकावले. या उपक्रमाबाबत पालकांमध्ये उत्साह दिसून आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक सिंधुताई दुधे,प्रणीता मोरे, सुनिता नासरे, अनुराधा कराळे, शिल्पा काळे, प्राजक्ता दुधे यांनी परिश्रम घेतलेया वेळी मुख्याध्यापक विठ्ठलराव थेटे शिक्षक श्री. किशोर उईके, घनश्याम बावणे तसेच शा. व्य. स. सदस्य आणि ग्रा. प. सदस्य उपस्थित होते.

Copyright ©