यवतमाळ सामाजिक

महिला दिनी नारी रक्षा समितीचा कार्याचा करण्यात आला सत्कार

महिला दिनी नारी रक्षा समितीचा कार्याचा करण्यात आला सत्कार

यवतमाळ- नुकत्याच झालेल्या महिला दिनाचे औचित्य साधून सिंहझेप समर्पण सखी, अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलन, इनरव्हील क्लब ऑफ ज्वेल्स व सुदर्शन वास्तू शास्त्र डॉ. गोपालजी ढोमने यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या उथ्थांनासाठी सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध संघटनांचा सन्मान व सत्कार सोहळा पार पाडण्यात आला,

याचं समारंभात सम्पूर्ण जिल्ह्यात अडचणीत सापडलेल्या महिला मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणाऱ्या नारी रक्षा समितीच्या कार्याचा याच कार्यक्रमात पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला, या वेळी सिंहझेप वृत्तपत्राचे संपादक विजय बुदेला, जिल्हा अंकुर साहित्य संघाच्या विध्याताई खडसे, प्रजापती ब्रम्हाकुमारी सेंटरच्या संचालिका मंगलादीदी,नम्रतादीदी,दुर्गाताई मिश्रा,पूनम जयपुरीया, प्रतिभाताई पवार इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते, सन्मानचिन्ह स्वीकारण्यासाठी नारी रक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद दोंदल, किर्तीताई दोंदल वर्षाताई चव्हाण, दुर्गाताई पटले, मंदाताई गुदडे, चेतनाताई राऊत, प्रज्ञाताई नरवाडे व संगीताताई पुरी इत्यादी अनेक सदस्य उपस्थित होते,

Copyright ©