Breaking News यवतमाळ

शेतकऱ्यांच्या हितासाठी बांधलेले बंधारेच गेले पाण्या खाली

दिग्रस प्रतिनिधी 

शेतकऱ्यांच्या हितासाठी बांधलेले बंधारेच गेले पाण्या खाली

पेळू शेतशिवरात धावंडा नदीवरील बंधारे बंधारा काही महिन्यातच पुराच्या पाण्यात गेला वाहून

दिग्रस तालुक्यातील मृद व जलसंधारण उपविभाग, दिग्रस या कार्यालयातंर्गत धावंडा नदीवर अनेक कोट्यावधींचे सिमेंट बंधारे बाधण्यात आले. परंतु पेळू या शेतशिवारात बांधलेला सिमेंट बंधारा पहिल्याच पुरात वाहून गेला. याबाबत नागरिकांच्या तक्रारीनुसार दिग्रसचे कार्यालय तसेच जिल्हाधिकारी, यवतमाळ येथील मृद व जलसंधारण कार्यालयाला याबाबत माहिती तसेच इस्टिमेटनुसार काम करण्यात आले नाही किंवा झाले असेल तर त्या सिमेंट बंधारा वाहून कसा गेला? अशी माहिती विचारली असता संबंधित अधिकारी, अभियंता यांचेकडून टाळाटाळीचे व उडवाउडवीची उत्तरे मिळाली. शिवाय 1 सप्टेंबर 2022 व 13 सप्टेंबर 2022 रोजी जिल्हाधिकारी, यवतमाळ यांचेकडे केलेली तक्रार, सोबतच पालकमंत्री संजय राठोड यांना दिग्रस तहसीलदार यांच्या मार्फत पाठविलेल्या निवेदनाच्या तक्रारी नंतरही चौकशी सुद्धा करण्यात आली नाही. वाहून गेलेल्या सिमेंट बंधाऱ्याची तसेच संबंधित अधिकारी, अभियंता यांची चौकशी व्हावी. सोबतच संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून संबंधित नुकसान भरपाई करून घेऊन यांचा परवाना रद्द करण्यात यावा, अशी मागणी गावकऱ्यांसह तक्रारदारांनी केली आहे. तक्रारदाराने संबंधित अभियंता अधिकारी यांना अनेक वेळा भेटून लेखी तोंडी विचारणा केली असता आठ दिवसात समिती बसवतो उद्या चौकशी लावतो तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल असे उडवाउडीचे उत्तरे देऊन टाळण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु कोट्यावधीचे बंधारे अक्षरशः पाण्यात वाहून गेले, ज्या शेतकऱ्यांना या बंधाऱ्याचा लाभ मिळणार होता ते मात्र शेतकरी या पाण्यापासून वंचित राहिले उलट ज्या शेतकऱ्यांनी हे बंधारे बांधण्यासाठी आपल्या जमिनी दिल्या त्यांचे अतोनात नुकसान ही झाले परंतु बंधाऱ्याच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना पाणी सुद्धा मिळाले नाही शासनाचे उद्दिष्ट मात्र कंत्राटदार अभियंता आणि अधिकाऱ्यांनी अक्षरशः पाण्यात बुडऊन आर्थिक लाभ सादल्याचा प्रकार दिसून येत आहे. याबाबत शेतकऱ्यांची तीव्र नाराजी असून. योग्य चौकशी न झाल्यास उग्र आंदोलन करण्याची शेतकऱ्यांन सह गावकरी मंडळीची तयारी असल्याचे बोलल्या जात आहे

Copyright ©