यवतमाळ सामाजिक

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

प्रतिनिधी सागर मुडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

 

पांढरकवडा प्रतिनिधी :- पांढरकवडा तालुक्यातील करंजी येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी दिनांक १० मार्च २०२३ रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून मालार्पण करण्यात आले.

या कार्यक्रमास गावातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक तिरुपती कंदकुरीवार शिवसेना तालकाप्रमुख संजय आंबटकर क्रिष्णा गजबे आनंद साठे विलास होलगीलवार सुंदरदास कांबळे नारायण वासेकार संजय कुंडलवार डॉ बावणे परसराम चव्हाण बाबूलाल चव्हाण नयन दर्वे सागर मुडे रुपेश राठोड अंकित पेंढारकर चंदन क्षीरसागर राज गुप्ता अमोल जाधव यश राठोड नितीन जाधव जीवन राठोड गोलू मुडे गितेश राठोड हे उपस्थित होते.

Copyright ©