यवतमाळ सामाजिक

जीवनातील सर्व अडथळे पार करण्यासाठीचे धैर्य स्त्रियांनी ठेवायला हवे – जिल्हाधिकारी अमोल येडगे

जीवनातील सर्व अडथळे पार करण्यासाठीचे धैर्य स्त्रियांनी ठेवायला हवे

– जिल्हाधिकारी अमोल येडगे

ग्रामपंचायत बोरगाव दाभडी येथे महिलांसाठी खास कार्यक्रम घे भरारी

ग्रामसेवक विजयकुमार ठेंगेकर यांचे जिल्हाधिकारी यांचेकडून विशेष कौतुक

वैयक्तिक आणि व्यावसायिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दररोज कठोर परिश्रम करणाऱ्या महिलांचे कौतुक करण्याचा हा जागतिक महिला दिनाचा सोहळा आहे. बऱ्याच लोकांसाठी महिलांची भूमिका केवळ घरातील कामे करण्यासाठीच मर्यादित असतात अशी आहे यामध्ये बदल होणे आवश्यक आहे कारण स्त्रिया पुरुषासारख्या प्रत्येक गोष्टी समान स्वातंत्र्य आणि संधीसाठी पात्र आहेत जग लैंगिक समानतेकडे वाटचाल करीत आहे ते पुरुष आणि स्त्रिया दोघांमधिल समतोलाकडे वाटचाल करत आहे. कशामध्ये शांतता न्याय समानता आणि विकासासाठी केलेल्या संघर्षाची आठवण ठेवण्यासाठी देशभरातील महिला विविध सांस्कृतिक आणि वंशीय समूहाच्या सर्व सीमा पार करतात. आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करतांना स्वतःची किंमत जाणवणे आणि संभावतेनुसार उद्दिष्ट साध्य करणे त्याशिवाय जीवनातील सर्व अडथळे पार करण्यासाठीचे धैर्य स्त्रियांनी ठेवायला हवे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. ते जागतिक महिला दिनानिमित्त आर्णी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत बोरगाव दाभडी द्वारा आयोजित *”घे भरारी”* या विशेष कार्यक्रमात बोलत होते.

 

ते पुढे म्हणाले की, महिला ह्या आपल्या कुटुंबाच्या माध्यमातून गावाच्याच नव्हे तर साऱ्या देशाच्या विकासात हातभार लावत असतात. त्यामुळे महिलांनी आज सामाजिक , शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकिय, उद्योजकीय अशा सर्व क्षेत्रात समोर यायला हवे. त्यासाठी ग्रामपंचायतीच्या संपर्कात आपण राहायला हवे व ग्रामपंचायतीच्या व गाव विकासाच्या प्रत्येक उपक्रमात आपला सहभाग नोंदवून आपण यशस्वी भरारी घ्यायला हवी असे सांगून त्यांनी ग्राम विकासासाठी शुभेच्छा दिल्या.

 

पुढे त्यांनी मला कुणीही ग्रामसेवक सहसा भेटायला येत नाही आपले ग्रामसेवक मला एकमेव भेटले आहे त्यांची कामाची आवड व महिलांसाठी मी येथे आलो असल्याचे सांगून त्यांनी ग्रामसेवक विजयकुमार ठेंगेकर यांचे विशेष कौतुक केले.

 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोरगाव दाभाडी ग्रामपंचायतीचे सरपंच नरेशभाऊ राठोड, उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी अमोलजी येडगे, विशेष अतिथी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा जिल्हा प्रभारी भरोसा असेल व दामिनी पथक यवतमाळ जिल्हा प्रमुख विजयाताई पंधरे, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कोळपकर, उपविभागीय अधिकारी अनिवृद्ध बक्षी, तहसीलदार परशराम भोसले, गटविकास अधिकारी जयश्रीताई वाघमारे, ठाणेदार शाम सोनटक्के, केंद्र प्रशासक सखी वन स्टॉप सेंटर जिल्हा महिला व बाल विकास विभाग यवतमाळच्या मीनल ताई जगताप, विकास गंगा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रंजीत बोबडे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी मुरलीधरजी भगत, ग्रामपंचायती तेंडोळीच्या सरपंच सपनाताई र. राठोड, ग्रामपंचायत दाभडीचे सरपंच दिनेश भाऊ नागोसे, तालुका कृषी अधिकारी सुळे, महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान उमेदचे विलास राठोड, ग्रामसेवक विजयकुमार ठेंगेकर, उपसरपंच ज्ञानेश्वर मेश्राम, एसपीएम हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.प्रगती व्यवहारे प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते.

 

यावेळी उमेद अभियानाच्या माध्यमातून काम करणाऱ्या आयसीआरपी, एफएलसीआरपी, पशु सखी, ग्राम स्तरावर सेवा देणाऱ्या आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, शिक्षिका आणि उमेद अभियानाच्या माध्यमातून तसेच प्रधानमंत्री अन्नप्रक्रिया उधोगांतर्गत लघुउद्योग सुरू करणाऱ्या व यशस्वी ठरलेल्या महिलांना जिल्हाधिकारी अमोलजी येडगे यांच्या हस्ते “घे भरारी- नारी सन्मान” देऊन गौरविण्यात आले.

 

तसेच यावेळी कृषी विभागामार्फत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग (PMFME) योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या लाभार्थी सौ. जयश्रीताई पुनवटकर यांनी सुरू केलेल्या हळद, मिरची व मसाला प्रक्रिया उद्योगाला मा. जिल्हाधिकारी श्री येडगे यांनी भेट देऊन प्रकल्पाबद्दल लाभार्थ्याचे अनुभव ऐकून चर्चा केली.

 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजयकुमार ठेंगेकर यांनी तर सूत्र संचालन एस.पी.एम. हायस्कूलचे …. तायडे यांनी तर आभार प्रदर्शन विकासगंगा समाजसेवी संस्थेच्या समन्वयक स्वाती राठोड यांनी केले.तर या कार्यक्रमात विजयाताई पंधरे यांनी महिला सक्षमीकरण व स्व-संरक्षण या विषयावर तर मीनल जगताप यांनी स्त्री अत्याचार व समाज व्यवस्था तर देवेंद्र राजूरकर यांनी बाल संरक्षण यावर मार्गदर्शन केले.

 

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायतीचे सदस्य सुशिलाबाई राठोड, सौ मनीषा केराम, सौ निशा आडे, सौ शितल राठोड, सौ. बेबी चव्हाण, उषा चव्हाण, निलेश चव्हाण, अनिल भाऊ पवार, ग्रामपंचायत कर्मचारी विनोद मेश्राम, दिगंबर फुलझेले, संगणक परिचालक जगदीश चव्हाण, महिला प्रभाग संघाच्या जयश्रीताई पुनवटकर, महिला ग्रामसंघाच्या आयसीआरपी रीताताई राठोड, मेघा बन्सोड, तेंडोळीच्या। आयसीआरपी ज्योतीताई निंबाळकर, वर्षा निंबाळकर, शारदा निकुरे, दाभडीच्या आयसीआरपी वनिता राठोड यांच्यासह शिक्षण प्रसारक मंडळ हायस्कूलचे सर्व शिक्षक, शिक्षिका, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक हटवारे, नितेश मेश्राम व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Copyright ©