यवतमाळ सामाजिक

यवतमाळ शहरातील नागरिकांना सुविधा मिळपर्यंत कोणी टॅक्स भरू नये – भाई अमन  

यवतमाळ शहरातील नागरिकांना सुविधा मिळपर्यंत कोणी टॅक्स भरू नये – भाई अमन  

यवतमाळ -: यवतमाळ नगरपालिकेच्या वतीने रिक्षावर फिरून नागरिकांनी टॅक्स भरून सहकार्य करावे असे मुख्याधिकारी यांचे मार्फत जाहिरात करण्यात येत आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून यवतमाळ नगर परिषदेवर प्रशासकराज असून संपूर्ण कारभार गोंधळलेला आहे.तसेच यवतमाळ शहरातील नागरिकांना सुख सुविधा पासून वंचित राहावे लागत आहे. यवतमाळ शहरातील परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली असून ठीक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे नाल्यातुंबलेल्या नागरिकांना पाणी नाही, तसेच यवतमाळ शहरातील रस्त्यावरील स्ट्रीट लाईट गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. याकडे नगरपालिका स्पष्ट दुर्लक्ष करीत आहे.यामुळे जोपर्यंत यवतमाळकरांना सुख सुविधा दिल्या जात नाही.तोपर्यंत कुणीही टॅक्स भरू नये असे आवाहन आम आदमी पार्टीचे पश्चिम विदर्भ सहसंयोजक भाई अमन यांनी नागरिकांना केले आहे.गेल्या काही वर्षांपासून यवतमाळ शहरातील गोरगरीब नागरिकांना घरकुलचे स्वप्न दाखवण्यात आले.मात्र अनेक नागरिकांना या योजनेपासून वंचित रहावे लागत आहे.

Copyright ©