यवतमाळ सामाजिक

समता साहित्य अकादमी तर्फे किर्ती चिंतामणी पुरस्कृत

समता साहित्य अकादमी तर्फे किर्ती चिंतामणी पुरस्कृत

यवतमाळ : जागतीक महिला दिना निमित्त समता साहित्य अकादमी तर्फे किर्ती चिंतामणी (अधिक्षिका जिल्हा कारागृह, यवतमाळ) वर्ग-१ यांना “स्त्री शक्तीचा सन्मान” चिन्ह, पुष्पगुच्छ, व शाल श्रीफळ देवून समता साहित्य अकादमीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. देवानंद तांडेकर, जिल्हाध्यक्ष दिलीप बारडे, महासचिव पुरण तांडेकर, युवा अध्यक्ष रोहीत तांडेकर यांचे हस्ते पुरस्कृत करण्यात आले.

किर्ती मॅडम यांचे परिस्थितीवर स्वार होऊन काम करण्याची जिद्द आणि प्रबळ इच्छा शक्तीच्या बळावर अल्पावधीतच यवतमाळ करांच्या तसेच राज्याच्या शासन दरबारी आपल्या कार्यकर्तुत्वाची अमीट छाप बजावली. या त्यांच्या सामाजीक व शासकीय कार्याची दखल घेत समता साहित्य अकादमी दरवर्षी अशा कर्तव्यदक्ष व्यक्तींची जागतीक महिला दिनी “स्त्री शक्तीचा सन्मान” या पुरस्कारानी पुरस्कृत करतात.

या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सावरकर, सचिव विजय बिजुलकर, सहसचिव

जयदेव पाटील आदि अकादमीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Copyright ©