यवतमाळ सामाजिक

जनवादी बांधकाम कामगार मजदुर संघटनेला अखेर यश प्राप्त

यवतमाळ प्रतिनिधी

जनवादी बांधकाम कामगार मजदुर संघटनेला अखेर यश प्राप्त

बुधवार दिनांक 8 मार्च 2023 रोजी जनवादी बांधकाम कामगार मजदुर संघटना यवतमाळ यांच्या वतीने नगर पंचायत कार्यालय राळेगाव शहरातील गवंडी बांधकाम कामगार व इतर २१ प्रकारच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांना ९० दिवसाच्या प्रमाणपत्रावर राळेगाव नगर पंचायतचे मुख्याधिकारी हे महाराष्ट्र शासनाच्या २०१४ च्या शासन निर्णयाप्रमाणे गेल्या एक ते दीड वर्षापासून सही व शिक्का देत नसल्यामुळे नगर पंचायतचे मुख्याधिकारी यांच्या विरुध्द संघटनेने बुलंद आवाज उठवून दिनांक ८ मार्च २०२३ रोजी हो घातलेल्या प्रमाणे कामगारांच्या प्रमुख मागण्याचे ठिय्या आंदोलन नगर पंचायतचे मुख्याधिकारी यांनी कामगारांच्या संपूर्ण मागण्या कोणतीही अट न ठेवता मान्य करून आज रोजी राळेगाव शहरातील कामगारांना सही व शिक्का देवुन अखेर गेल्या एक ते दीड वर्षापासूनच्या प्रलंबित कामाला जनवादी बांधकाम कामगार मजदुर संघटनेच्या या ठीय्या आंदोलनाला संपूर्ण पणे आज रोजी यश प्राप्त झाले तसेच राळेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील काही ग्रामसेवक हे कामगारांना ९० दिवसाच्या प्रमाणपत्रावर सही व शिक्का देत नसल्यामुळे संघटनेच्या वतीने मा. पद्माकरजी मडावी साहेब सहाय्यक गटविकास अधिकारी प. स राळेगाव यांच्या सविस्तर चर्चा करून संघटने मार्फत निवेदन दिल्याप्रमाणे मा. मडावी साहेब यांनी तत्काळ ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षाची फोनवर बोलून कामगारांना कोणतीही ठेकेदाराची अट न लावता घर मालकाच्या स्वाक्षरीच्या आधारे कामगारांना सही व शिक्का देण्यात यावे असे आदेश दिल्याप्रमाणे कोणत्याही ग्रामसेवकानी ९० दिवसाच्या प्रमाणपत्रावर सही व शिक्का न दिल्यास अश्या ग्रामसेवका विरूद्ध पंचायत समिती कार्यालयाकडून कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले यावेळी जनवादी बांधकाम कामगार मजदुर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रत्नपाल डोफे सौ वंदनाताई म्हैसकर उपाध्यक्ष.मा पद्माकरजी घायवान प्रमुख सल्लागार. सम्यक म्हैसकर सहसचिव. सौ सुजाता डोफे कोषाध्यक्ष संजय करवटकर तालुका उपाध्यक्ष राळेगाव गणेश बावणे तालुका सहसचिव. स्वप्नील नगराळे अमोल वांढरे अंकूश बुरबुरे सुधीर चौधरी नीकेश उईके प्रशांत आळंगावकर अनिल झोटिंग. खुशाल नगराळे शंकर चाफेकर प्रवीण तामगाडगे शंकर गंडे गजानन सोनुर्ले गणेश चव्हाण अविनाश म्हैसकर दिलिप नेलेकर ईश्वर झिले सुनंदा चव्हाण. सुरेखा राऊत. स्नेहा येसनसुरे कल्पना नारनवरे लता झाडे वैशाली शिवरकर शारदा सवसाकडे मंदा जिरे मनीषा शिवरकर मंगला मेश्राम नम्रता शिवरकर द्रारका नारनवरे अर्चना नारनवरे. दुर्गा शिवरकर पुष्पा शिवरकर मनीषा अत्राम इतर कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते

Copyright ©