यवतमाळ सामाजिक

पंतप्रधान आवास योजणेपासून ओबीसी लाभार्थी वंचीत   

पंतप्रधान आवास योजणेपासून ओबीसी लाभार्थी वंचीत   

विलास होलगीलवार करंजी रोड

केंद्र सरकारच्या वतीने मागील आठ वर्षा पासून पंतप्रधान आवास योजना शहरी व ग्रामीण भागात प्रत्येक गरीब गरजु लाभार्त्यांना गाव तेथे घर या संकल्पनेतुन आवास योजना राबविण्यात येत आहे परंतु पांढरकवडा पंचायत समिती अंतर्गत करंजी रोड ग्रामपंचायत मध्ये वारंवार ग्रामसभेत सर्व प्रवर्गातील गरजू लाभार्थी ची यादी पंचायत समिती मार्फत जिल्हा परिषद ते राज्य सरकार दरबारी प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे प्रामुख्याने ओबीसींना जाणीवपूर्वक दुय्यम स्थान दिले जात आहे कारण करंजी येथे मोठ्या प्रमाणात ओबीसी गरीब गरजु लाभार्थी अनेक वर्षांपासून पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळेल या आशेने पंचायत समिती पांढरकवडा येथे अधिकारी वर्गांना प्रतक्ष भेटून विचारले असता अजून पर्यंत ओबीसी वर्गातील यादी वरून आली नाही असे सांगितले जाते तेव्हा ग्रामपंचायत स्तरावर चौकशी केली असता ग्रामसचिव सुध्दा असेच काही तरी उडवा उडवीचे उत्तर देताना अनेक वेळा असे अनुभव ओबीसी लाभार्थ्यांना येत आहे अश्या अनेक सरकारी योजणे पासून ओबीसी घटक वारंवार वंचीत राहतो परंतु अतिशय गरीब परिस्थितीत जीवन जगताना वाढत्या महागाई च्या काळात गरिबांना घरा चे स्वप्न कधीतरी पूर्ण करण्यासाठी सरकार दरबारी विचार केला जातील का? असा प्रश्न ओबीसी गरीब लाभार्थी करीत आहे सातत्याने ओबीसींन वर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जिल्हा प्रशासन सन्माननीय जिल्हाधिकार यवतमाळ यांना वंचीत गरीब गरजु ओबीसी लाभार्थी चे निवेदन समजून पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळवून देतील अशी अपेक्षा घरकुल लाभार्थी मागणी करीत आहे

Copyright ©