Breaking News यवतमाळ

दुचाकी आमने सामने भिडल्याने दोघेही दुचाकीस्वार जागीच ठार

दुचाकी आमने सामने भिडल्याने दोघेही दुचाकीस्वार जागीच ठार

वडगाव जंगल पोलीस स्टेशन अंतर्गत गांधी नगर येथे दोन दुचाकी अपघातात दोघेही दुचाकी स्वार जागीच ठार झाल्याची घटना यवतमाळ पांढरकवडा रोडवर घडली

हा अपघातात इतका जबर होता की दोन जण जागीच ठार झाले, तर एक जण जखमी झाला. चंद्रपूर कडे जाणारी टूव्हीलर व जोडमोहा कडे येणारी टूव्हीलर सायंकाळी चार वाजताच्या सुमारास गांधीनगर जवळ हा अपघात झाला. या अपघातात दोघे जगीच ठार झाले व एक गंभीर जखमी जोडमोहा येथिल युवक सोनू राठोड वय २५रा.जोडमोहा चा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या युवकाची अजूनही ओळख पटली नाही त्यांना यवतमाळ शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे वृत्त प्रकाशित करण्या आधी पोलिस घटना स्थळी पोहोचलेच नसल्याने जनतेत रोष वेक्त करण्यात येत आहे.

Copyright ©