महाराष्ट्र सामाजिक

महाराष्ट्राचा महाविकास. सर्व समावेशक पंचामृत बजेट राज्याच्या अर्थसंकल्पावर सीए विशाखा खेतान यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्राचा महाविकास. सर्व समावेशक पंचामृत बजेट राज्याच्या अर्थसंकल्पावर सीए विशाखा खेतान यांची प्रतिक्रिया

 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी पंचामृत विकास संकल्पने देशाच्या $5 ट्रिलियनपैकी राज्याचे $1 ट्रिलियन विकास लक्ष्य सिद्ध करण्याच्या उद्देशाने आगामी निवडणुका घेण्याचा प्रयत्न केला आहे.

शेतकरी, वृद्ध, महिला,युवा, रोजगार निर्मिती, पर्यावरण, शिक्षण, व्यापार, उद्योग यांवर अर्थसंकल्पात विशेष लक्ष देण्यात आले आहे.

यवतमाळ जिल्ह्याच्या विकासाची मुख्य आशा वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्गाला प्राधान्य देऊन कामाला गती देण्याचा निर्णय अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंतची कर्जमाफी, विमा संरक्षणात सहकार्य, शेतकरी उत्पादकांशी सचोटी ने भाव आणि शेतकऱ्यांना अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. एसटीमध्ये महिलांना ५०% सवलत, इयत्ता आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिला जाणार आहे. दुग्धविकास आणि गायींच्या संततीला प्रोत्साहन.

बाळासाहेब ठाकरे, छत्रपती शिवाजी महाराज आणि अनेक महापुरुषांच्या नावाने अनेक योजना आणल्या आहेत.

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे.

थोडक्यात, आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थमंत्र्यांनी सर्वांगीण विकास करून राज्यातील मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.

Copyright ©