महाराष्ट्र सामाजिक

कला भूषण पुरस्काराने सुनिल चव्हाण सन्मानित

अहमदनगर प्रतिनिधी

कला भूषण पुरस्काराने सुनिल चव्हाण सन्मानित

सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांचे वतीने महिला दिना निमित्त माऊली संकुल सभागृह अहमदनगर येथे दि.8 मार्च 2023 रोजी आपल्या उल्लेखनिय कार्य कर्तुत्वाने समाजात ठसा निर्माण करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.यादवराव पावसे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून लावणी सम्राज्ञी प्रियंका शेट्टी ही होती . सिने अभीनेत्री अलका कुबल यांचे हस्ते सुनिल रामचंद्र चव्हाण रा.माळेगांव तह.आर्णी .जी.यवतमाळ . यांना कला भूषण या पुरस्काराने गौरविण्यात आले सुनिल चव्हाण यांनी स्त्री व पुरुष च्या आवाजात गीते गाऊन रसिकांची मने जिंकली.कार्यक्रमाचे आयोजन बाबा पावसे यांनी केले या वेळी एकूण पंनास व्यक्तींना सन्मानित करण्यात आले

Copyright ©