महाराष्ट्र सामाजिक

शिवणी जामगा गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही !!आ.मोहन हंबर्डे

लोहा प्रतिनिधी -बापुसाहेब कापुरे

 शिवणी जामगा गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही !!आ.मोहन हंबर्डे

माननीय आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांच्या हस्ते शिवणी जामगा येथील २.५ कोटी रूपये नदीवरील पुलाच्या कामांचे प्रत्यक्ष जेसीबी चालवून केले उद्घाटन! करण्यात आले,

 

शिवणी जामगा येथील विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन नांदेड दक्षिण चे कार्यसम्राट आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांनी शिवणी जामगा येथील २.५ कोटी रुपयांच्या नदी वरील पुलाच्या कामाच्या उद्घाटन प्रसंगी केले.

 

लोहा तालुक्यातील व नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मौ.शिवणी जामगा येथील नदीवर आ. मोहन अण्णा हंबर्डे यांच्या प्रयत्नातून सा.बा. विभागा मार्फत २.५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून त्या कामांचा शुभारंभ दि. ६ मार्च रोजी आ. मोहन अण्णा हंबर्डे यांच्या हस्ते उद्घाटन करून करण्यात आले.

 

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून आ. मोहन अण्णा हंबर्डे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास मोरे, डॉ. कालीदास मोरे, यादवराव मोरे, नांदेड दक्षिण सा.बा. चे उपविभागीय अभियंता नाईक, शिवणी जामगा चे उपसरपंच तुकाराम पाटील जामगे , सरपंच प्रतिनिधी छत्रपती स्वामी, खडकमांजरीचे सरपंच प्रतिनिधी माधवराव कापसे, गुतेदार हकीम,लतीफ,आनंदराव जामगे, जळबाजी जामगे यादोजी पाटील जामगे गोविंद जामगे,रामदास जामगे,विजय जामगे, गणपत पाटील जामगे, अमिन शेख,ओम भालके,त्रिंबक जामगे, भरत जामगे,भगवान वाघमारे बाबुराव कापसे ,राम एडके , सुमेध एडके आदी उपस्थित होते.

Copyright ©