यवतमाळ सामाजिक

जागतिक महिला दिनानिमित्त सुदर्शन वास्तु शास्त्र तर्फे कर्तृत्वान महिलांचा सत्कार व वास्तु आनंद मार्गदर्शन शिबीर संपन्न

जागतिक महिला दिनानिमित्त सुदर्शन वास्तु शास्त्र तर्फे कर्तृत्वान महिलांचा सत्कार व वास्तु आनंद मार्गदर्शन शिबीर संपन्न

यवतमाळ  जागतिक महिना दिनाचे औचित्य साधून ५ मार्च रोजी संदीप मंगलम यवतमाळ येथे सिंहझेप समर्पण सखी, अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलन, इनरव्हील क्लब ऑफ ज्वेल्स यवतमाळच्या वतीने सायंकाळी ६ वाजता सुदर्शन वास्तु आनंद मार्गदर्शन शिबीराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या प्रसंगी सुदर्शन वास्तु शास्त्राचे संचालक आचार्य डॉ. गोपालजी ढोमणे यांनी वास्तु शास्त्राच्या संदर्भात उपस्थित शेकडो महिला व पुरुषांना मार्गदर्शन करुन उपस्थितांचे मने जिंकली. या प्रसंगी मंचावर सुदर्शन वास्तु शास्त्राचे संचालक आचार्य डॉ. गोपालजी ढोमणे, जिल्हा अंकुर साहित्य संघाच्या अध्यक्षा सौ. विद्याताई खडसे, प्रजापती ब्रह्माकुमारी सेंटरच्या संचालीका मंगलादिदी, नम्रतादिदी, सिंहझेप समर्पण सखीच्या संयोजिका दुर्गा मिश्रा, अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलनाच्या अध्यक्षा सौ. पुनम जयपुरिया, इनरव्हील क्लब ऑफ ज्वेल्सच्या अध्यक्षा प्रतिभा पवार आदि मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना गोपालजी ढोमणे यांनी घरातील वास्तुच्या दोषातून होणाऱ्या संभव्य अडचणी, समस्या, आरोग्य तसेच शैक्षणिक अडथळे कसे निर्माण होतात याबाबत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन करुन हे दोष निवारण्याकरिता उपाययोजना सांगुन उपस्थितांचे मने जिंकली तर नम्रतादिदींनी आपल्या मनोगतातून महिलांनी समाज उत्थानासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन प्रथम सत्रात केले. तर द्वितीय सत्रामध्ये महिलांच्या उत्थानासाठी अविरतपणे काम करणाऱ्या महिलांचा सत्कार या प्रसंगी करण्यात आला. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा अंकुर साहित्य संघाच्या अध्यक्षा विद्याताई खडसे, सुदर्शन वास्तु शास्त्राचे संचालक गोपाल ढोमणे, प्रजापती ब्रह्माकुमारीच्या संचालीका मंगलादिदी, राष्ट्रीय आदर्श शिक्षक सतीश काळे, या प्रकल्पाचे मार्गदर्शक विजय कुमार बुंदेला, सुधीर कैपिल्यवार आदि मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते. बेस्ट एक्टीव्ह प्रेसिडेंट म्हणून प्रतिभा पवार, विशेष सहयोगी प्रेसिडेंट सौ. पुनम जयपुरिया, विशेष सहयोगी प्रेसिडेंट साक्षी अंबरकर तर बेस्ट एक्टीव्ह ग्रुप म्हणून सिंहझेप समर्पण सखी यवतमाळ यांना मान्यवरांच्या हस्ते विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तर सुप्रसिद्ध बाल गायिका स्वरा लाड, सेवानिवृत शिक्षीका सिंधूताई मगरे, इनरव्हील क्लब ऑफ ज्वेल्सच्या माजी अध्यक्षा रितु गायकवाड, सिंहझेप समर्पण सखीच्या संयोजिका दुर्गा मिश्रा, योग शिक्षीका सौ. अर्चना पांडे तसेच इनरव्हील क्लब ऑफ ज्वेल्स, अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलन, सिंहझेप समर्पण सखी आदिंचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मोठ्या संख्येने महिलांचा जनसमुदाय उपस्थित होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रियंका कदम यांनी तर संचलन पुजा अग्रवाल यांनी केले. आभार प्रदर्शन प्रेरणा गुरावा यांनी केले. या प्रसंगी आयोजित लकी ड्रॉ मध्ये सोनाली बैस व अंजली चिरोळकर यांची वर्णी लागली.

Copyright ©