यवतमाळ सामाजिक

आर्णीत घराला आग,सगळेकाही जळून राख

आर्णीत घराला आग,सगळेकाही जळून राख

आर्णी शहरातील दाभडी रोडवरील कंबलपोष लेआऊट मधील शेख इरफान शेख रमजान यांच्या राहत्या लाकडी पाट्याच्या घराला आग लागून घरातील सगळे साहित्य जळून राख झाल्याची घटना मंगळवारी 7मार्चला पहाटे घडली.घरात राहणारे लहान मोठे 6सदस्य बाहेरगावी गेलेले असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही,मात्र 7लाख रुपये पर्यंतचा आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.लागलेल्या आगीत वर्ग 10वा च्या विद्यार्थिनीचे परीक्षा हॉल प्रवेशपत्र व ईतर सर्व डाकुमेंट सह कपडे,रोख रक्कम,चांदी सोन्याचे काही दागिने,धान्य,टिव्ही,फ्रीज,वॉशिंग मशिन,सोफा,पलंग, डिस्कवर दुचाकी, भांडेबर्तन व ईतर साहित्य जळून बेचिराख झाले आहे. पहाटे आग लागल्याची माहिती मिळताच आर्णी नगरपरिषद चे अग्निशमन चे वाहन घटनास्थळी दाखल होऊन तातडीने आग नियंत्रणात आणली. आभाळी वातावरण व वारा सुटलेला असल्याने लगतची घरे सुध्दा भीषण आगीच्या भक्ष्यस्थानी जाण्याची शक्यता होती,मात्र वेळीच नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती पत्रकार रफिक सरकार व सय्यद अक्रम यांनी नायब तहसीलदार दिलीप कडासने यांना देताच त्यांनी तातडीने तलाठी चौधरी यांना पाठवून अहवाल तयार केला आहे.व कंट्रोल डीलर ला सदर कुटुंबास धान्य पुरवठा करण्याच्या सूचना केल्या आहेत.अचानक लागलेली आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. घटनास्थळी पोलिस जमादार विजय चव्हाण यांनी सुध्दा पाहणी केली. झालेल्या नुकसान ची भरपाई मिळावी यासाठी साश्रुनयनांनी पीडित घरच्या महिलेने केली आहे.

Copyright ©