यवतमाळ सामाजिक

जल जिवन मिशन अंतर्गत उभे सागवान पाडून वनविभागाच्या हद्दीत जल जिवन मिशनचे खोदकाम सुरू

जल जिवन मिशन अंतर्गत उभे सागवान पाडून वनविभागाच्या हद्दीत जल जिवन मिशनचे खोदकाम सुरू

वनधिकारी झोपेतच,

 

मौजे सावळा येथे जल जिवन मिशन अंतर्गत ग्रामपंचायत विहिरीचे काम सुरू करण्यात आले ते काम वनविभागाच्या हद्दीत सुरू करण्यात आले,एवढेच नाही तर संबधित ठेकेदारांनी कोणतीही परवानगी न घेता चक्क उभी असलेली सागवान झाडे मुळा समवेत जे सी बी च्या साह्याणी उपडून फेकण्यात आले असतानाही वनाधिकारी झोपेत का ? असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे,शेतकऱ्यांनी एक फाटा जरी आणला तर त्याचेवर कारवाई केल्या जाते तर आज या ठिकाणी झाडे उपडून फेकली तरी अधिकारी कारवाई का करण्यात येत नाही,असा हि सवाल करण्यात येत आहे!,येथील अनधिकृत जागेवर विहीर खोदकाम सुरू असल्याचे बोलल्या जात असून या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे ज्या ठिकाणीJCB ने काम चालू आहे ते काम कॉन्ट्रॅक्टर नी जलसंपदा विभागाने दिलेला नियोजित जागा सोडुन दुसरीकडे २० फुट अंतरावर विहीर चे अनधिकृत खोदकाम सुरू केल तसेच त्यामध्ये ३ सागवान चे ४० वर्षाचे जुने झाड पाडलेत यात ठेकेदार व सरपंचां यानी मनमानी कारभार करीत नियमांना तिलांजली देत काम सुरू केले यामध्ये कोणत्याही ग्रामपंचायत सदस्याला किंवा गावकऱ्यांना विश्वासात न घेता हे काम सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे या प्रकरणी त्वरित चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ करीत आहे.

Copyright ©