यवतमाळ सामाजिक

घाटंजी येथे लाईनमन दिवस मोठ्या हर्षउल्हासात साजरी करण्यात आले.

प्रतिनिधी/घाटंजी अमोल नडपेलवार

घाटंजी येथे लाईनमन दिवस मोठ्या हर्षउल्हासात साजरी करण्यात आले.

घाटंजी: प्रथमतःच सन 2023 वर्षापासूनच जाहीर झालेल्या भारत सरकारच्या आदेशानुसार लाईनमन दिवस 4 मार्च रोजी महावितरणच्या घाटंजी उपविभागात मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला. विजेसारख्या अतिमहत्वाच्या क्षेञात जीवाची बाजी लावुन अहोरात्र विजपुरवठा सुरळीत ठेवणा-या लाईनप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतुने 4 मार्च हा दिवस या वर्षापासून लाईनमन दिवस म्हणुन पाळण्याचे शासनाने ठरविले आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन ठिकाण सोनु मंगलम अंजी रोड घाटंजी येथे पाचही विज वितरण केंद्रातील शिरोली, मोहदा, पारवा, घाटंजी (शहर), घाटंजी (ग्रामीण) येथील सर्व कर्मचा-यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री राजेंद्र राऊत उपकार्यकारी अभियंता तसेच प्रमुख अतिथी श्री हेमंतकुमार मलुडे सहाय्यक अभियंता ग्रामीण कु. भारती बावनकर सहाय्यक अभियंता, उपविभाग, घाटंजी श्री. आकाश इंगोले कनिष्ठ अभियंता, पारवा श्री. प्रमोद मुंडे कनिष्ठ अभियंता शिरोली कु. कोमल भांगे कनिष्ठ अभियंता, उपविभाग घाटंजी मा. कु. एश्वर्या नोमुलवार कनिष्ठ अभियंता, मोहदा यांची उपस्थीती लाभली. तद्नंतर सर्व कर्मचा-यांच्या उपस्थीतीत महावितरण मधील महत्वाचा घटक असलेल्या जनमित्राच्या सुरक्षीततेच्या हेतुने विद्युत सुरक्षीततेची शपथ घेण्यात आली.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालक श्री.धनराज पेटेवार यांनी केले. तद्नंतर स्वागत समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला. मंचावर उपस्थीत मान्यवरांनी लाईनमन दिवस निमीत्त्याने आयोजीत केलेल्या खेळांमध्ये प्राविण्य मिळालेल्या तसेच महावितरणचे कार्य बजावतांना उत्कृष्ट कामगीरी करणा-या कर्मचा-यांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी बुध्दीबळ, कॅरम, बॅटमींटन व क्रिकेट असे विविध खेळाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रम म्हणुन संगीत संध्या हा कार्यक्रम सायंकाळी आयोजीत करण्यात आला होता. यामध्ये महावितरणच्या प्राविण्य प्राप्त केलेल्या स्पर्धकांपैकी बॅटमींटन स्पर्धेत प्रमोद मुंडे कनिष्ठ अभियंता शिरोली सोबत नवाज शेख प्रधान तंत्रज्ञ शिरोली यांनी प्रथम पारितोषीक पटकाविले. तसेच आकाश इंगोले कनिष्ठ अभियंता पारवा अमोल गटलेवार वरिष्ठ तंत्रज्ञ पारवा यांनी व्दीतीय पारितोषीक पटकाविले. कॅरम स्पर्धेत वैभव मोतेवार व मोहम्मद आदील वरिष्ठ तंत्रज्ञ घाटंजी शहर यांनी प्रथम व व्दीतीय पारितोषीक निकेश मेश्राम, प्रशांत तलमले वरिष्ठ तंत्रज्ञ मोहदा यांना पटकाविले. बुध्दीबळ स्पर्धेत आकाश इंगोले कनिष्ठ अभ्रियंता पारवा यांनी प्रथम तर प्रमोद मुंडे कनिष्ठ अभियंता शिरोली यांनी व्दीतीय पारितोषीक पटकाविले. संगीत स्पर्धत अक्षय नगराळ वरिष्ठ तंत्रज्ञ घाटंजी ग्रामीण यांनी प्रथम पारितोषीक पटकाविले. तर क्रिकेट स्पर्धेत चुरशीच्या लढतीत घाटंजी ग्रामीण वितरण केंद्राने प्रथम पारितोषीक पटकाविले. क्रीकेट या स्पर्धेत बेस्ट बॉलर निलेश कवासे बेस्ट बॅटस्मन अजय नेवारे व बेस्ट किपर पारितोषीक सुधिरकुमार फुलझेले यांनी पटकाविले. या प्रसंगी उत्कृष्ट कामगार पुरस्कृत कर्मचारी विरेंद्र थुल, नितेश गाढवे, वैभव मोतेवार, विजय जाधव, सुनिल सपाट, रोशन वनकर, गणेश मैंद, नवाज शेख, अविनाश किनाके व दिलीप रुद्रावार अशा पाचही वितरण केंद्राअंतर्गत येणा-या कर्मचा-यांचा गुणगौरव करण्यात आला. कर्मचा-यांच्या मनोरंजनासाठी विशेष संगीत संध्या हा कार्यक्रम अलंकार आर्केस्टा घाटंजी यांचे सहाय्याने आयोजीत करुन छान गितांची मेजवानी उपस्थीत कर्मचा-यांच्या सहकुटुंबीय परिवारांना ऐकायला मिळाली. याचप्रसंगी दिवंगत मा. श्री. माणिकप्रभु नगराळे सहाय्यक अभियंता घाटंजी शहर यांना स्वरसुमनांनी श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. उपस्थीतांनी मनोगत व्यक्त करुन विज ग्राहकास चांगली सेवा देवून भविष्यातील उर्जा क्षेत्रातील आव्हान पेलण्याच संकल्प केला. कार्यक्रमाचा समारोपीय आभार प्रदर्शनाच्या प्रसंगी श्री. हेमंतकुमार मलुडे तसेच हॉल उपलब्ध करुन देणा-या सोनु मंगलमचे प्रो.प्रा. रामभाऊ खांडरे यांचे विशेष आभार मानले. क्रिकेट खेळासाठी एसपीएम मैदानाचे सर्व मित्र परिवाराचे आभार व्यक्त केले. तसेच कर्मचारी सहकुटुंबीयांचे त्यांनी विशेष आभार व्यक्त केले. सर्व सहकुटुंबीय परिवाराकरीता भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता विशेष मोलाचे प्रयत्न मा. श्री. हेमंतकुमार मलुडे यांना देवून त्यांनी इतर सर्व कर्मचा-यांचे सहकार्य लाभले. तसेच या कार्यक्रमास महावितरण कंत्राटदार असोसिएशन घाटंजी यांचे विशेष सहकार्य लाभले.

Copyright ©