यवतमाळ सामाजिक

गहू हाय का-तांदूळ हाय का- खरेदी करणारे टोळके धान्यासाठी घरोघरी

गहू हाय का-तांदूळ हाय का- खरेदी करणारे टोळके धान्यासाठी घरोघरी

जिल्हा पुरवठा अधिकारी यांचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष

स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे धान्य विकत घेण्यासाठी सध्या शहरात अनेक व्यापारी फिरत आहे गरिबांना मिळणाऱ्या धान्य हे व्यापारी विकत घेऊन बाजारात जादा दराने विक्री करत असल्याचे अनेक प्रकार समोर आले असताना पोलीस व जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यवाही करत नसल्याने नागरिक सुद्धा आश्चर्य व्यक्त करीत आहे

गहू हाय का तांदूळ हाय का अशी आरोळी आता यवतमाळ शहरात दररोज येत असून मालवाहू गाडीने घरोघरी जाऊन रेशनचे विक्री झालेलं धान्य खरेदीसाठी आता यवतमाळ काही टोळ्या सक्रिय झाल्याचं पहायला मिळते गरिबांना मोफत मिळणारा धान्य विकत घ्यायचं आणि बाजारात जादा दराने विकायचं असा प्रकार सध्या यवतमाळ शहरात सुरू आहे रेशन दुकानातून दर महिन्याला शासनाचा कोठा गरिबांसाठी वाटल्या जातो ही योजना गरिबांसाठी खूप महत्त्वाची असली तरी काही नागरिक हे घरोघरी फिरणाऱ्या दलालांना विक्री करताना दिसत आहे हा प्रकार प्रत्येक गावा गावात पहावयास मिळते,भोंगे लाऊन खुले आम गहू ,तांदूळ विकायचे आहे का? मात्र पोलीस व जिल्हा पुरवठा अधिकारी हे कारवाई का करत नाही असे एक ना अनेक प्रश्न कायमच आहे जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार हे नेहमीच जिल्ह्यातील इतर तालुक्यातील दौऱ्यावर असतात यावरून ते किती कर्तव्यदक्ष आहे हे दिसून येते मात्र ग्रामीण भागात होत असलेला काळा बाजार हे मात्र अधिकाऱ्यांना दिसत नाही तर यवतमाळ शहरात तर अनेक अधिकारी कर्मचारी फिरताना दिसतात मात्र कारवाई शून्य त्या मुळे धान्याचा काळाबाजार सुरू असल्याचं बोलल्या जात आहे आता न्यूज च्या बातमीपत्रात दिसणाऱ्या गाडीवर व अशा दलांना दलालांवर कर्तव्यदक्ष जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार हे काय कारवाई करतील याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे

Copyright ©