Breaking News यवतमाळ

आदिवासी महिलेला मारहाणीच्या प्रकरण पोलिसांनी दडपले

आदिवासी महिलेला मारहाणीच्या प्रकरण पोलिसांनी दडपले

पांढरकवडा पोलीस यांच्या दडपशाही विरोधात गोंडवांना संग्राम परिषदेचे एसपींना निवेदन

गोंडवाना संग्राम परिषदच्या शिष्ट मंडळाने केळापुरचे मस्तवाल सरपंच यांना तात्काळ अटक करा.या मागणीचे निवेदन एसपी यांना दिले.

पांढरकवडा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेले केळापूर ग्रा.पं. चे मस्तवाल गुंड प्रवृत्तीचे सरपंच सुरेश अनमूलवार यांनी घराच्या शुल्क वादावरून गावातील लोकान समक्ष २० फेब्रुवारी अंदाजे एक वाजून आदिवासी महिलेला बेदम मारहाण केले,एका असहायय आदिवासी विधवा महिलेची मानहानी ,बेइजत केली. सदर प्रकरणात पोलीसांनी आरोपीला पाठीशी घालून संरक्षण दिले व याउलट आरोपीचा रिपोर्ट घेऊन अन्याय ग्रस्त महिला वरती खोटे पोलिस गुन्हे दाखल करून,खोटे प्रकरणात गुन्ह्यात आदिवासी महिलेला फसविण्याचा प्रयत्न झाला आहे.न्याय मागणाऱ्या आदिवासीलाच आरोपी बनविल्या जाते ही पोलिसांची किमया अत्यंत गंभीर व अन्यायकारक आहे.या विरोधात आदिवासी महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी “गोंडवाना संग्राम परिषद”च्या वतीने पांढरकवडा तहसील कार्यालयासमोर दि.१/०३/२०२३ पासून साखळी उपोषणाला बसून दि.३/०१/२०२३ ला पोलीस अधीक्षक यवतमाळ याना भेटून प्रकरणाची सत्य माहिती सांगून निवेदन देण्यात आले.चर्चा झाल्यानंतर आरोपी वरती ३५४ IPC व ३(१)(११) अट्रोसिटी लावण्याचे आदेश दिले.

पांढरकवडा पो.स्टे. चे ठाणेदार ३५४ व ३(१)(११) कलम लावले नाही.ठाणेदार यांनी पक्षपात भेदभाव केला सरपंच व ठाणेदार एकाच जातीचे असल्यामुळे आदिवासींबाबत दुजाभाव केला .

ठाणेदार वरती निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी.या प्रकरणात न्याय न मिळाल्यास दि.२०/०३/२०२३ ला “गोंडवाना संग्राम परिषद”च्या वतीने तिर्व जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या वेळेला गोंडवाना संग्राम परिषदेचे नेते डॉ.निरंजन मसराम महादेव कोडापे संभा मडावी,दशरथ मडावी,बंडू सोयाम, भाऊराव मरापे,सागर मडावी,अजय कुमरे,वसंत कनाके,नरेश गेडाम,पवन आत्राम,शंकर गेडाम,नागोराव गेडाम,विलास जुमनाके, रेखा तायडे,निर्मला मेश्राम,अनिता मंडकांम, जंगा वेट्टी, अजाब मंडकांम इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.सरपंच यांना अटक व ठाणेदार यांना निलंबित करीत नाही तो पर्यंत न्याय मिळे पर्यंत हा संघर्ष सुरू राहील असा प्रशासनाला गंभीर इशारा देण्यात आला आला आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते अंकित नैताम यांनी एका प्रसिद्ध पत्रकार द्वारे कळविले आहे

Copyright ©