यवतमाळ सामाजिक

जिल्हास्तरीय “शेजार युवा संसद” कार्यक्रम,सामाजिक समता शिवा पुरस्कारासाठी,धुलीवंदन ‍निमित्त मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद.

जिल्हास्तरीय “शेजार युवा संसद” कार्यक्रम,सामाजिक समता शिवा पुरस्कारासाठी,धुलीवंदन ‍निमित्त मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद.

जिल्हास्तरीय “शेजार युवा संसद” कार्यक्रम जाजू महाविद्यालय येथे संपन्न

काळानुसार युवकांनी नवे तंत्रज्ञान आत्मसात करावे- ललितकुमार व-हाडे

यवतमाळ,दि.३ मार्च :- काळात सतत बदल होत आहे. काळानुसार युवकांनी नवे तंत्रज्ञान व नव्या गोष्टी आत्मसात करणे आवश्यक आहे. सध्या देशात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे केले जात असतांना युवाकांनी तृणधान्य काय आहे व याचा रोजच्या आहारात उपयोग व आरोग्यास किती फायद्याचे आहे याबाबत माहिती घ्यावी. तसेच आपल्या देशात जी-२० परिषद होत असतांना युवकांनी या परिषद बाबात जाणून घेतले पाहिजे,असे निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रंसगी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले.

 

संयुक्त राष्ट्रसंघाने सन २०२३ हे वर्ष “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्याअनुषंगाने जी-२० परिषद व तृणधान्य या विषयावर नेहरू युवा केंद्र,युवा कार्यक्रम व क्रिडा मंत्रालय,भारत सरकार यांच्या संयुक्त माध्यमातून जिल्हास्तरीय “शेजार युवा संसद” कार्यक्रमाचे आयोजन जाजू महाविद्यालय येथे करण्यात आले होते

सदर कार्यक्रमास जाजू एज्युकेशन संस्थेचे प्रकाश जाजू, सचिव आशिष जाजू, कोषाध्यक्षा शिल्पा जाजू, अमोलकचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राममनोहर मिश्रा, कॉलेज ऑफ मॅनेजमेन्ट ॲण्ड कॉम्युटर सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य रितेश चांडक तसेच प्रमुख मार्गदशक बाबाजी दाते कला वाणिज्य महाविद्यालयाचे डॉ.ताराचंद कंठाळे, अमरावती विद्यापीठाच्या गृहशास्त्र विभाग प्रमुख डॉ.वैशाली धनविजय यांची कार्यक्रमास उपस्थिती होती.

यावेळी पौष्टिक तृणधान्य व जी-२० या विषयावर तज्ञ मार्गदर्शकांनी महाविद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थिनींना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. “अतिथी देव भव” या वर लोक संस्कृतीला अनुसरून महाविद्यालयीन विद्यार्थांकडून लोकनृत्य सादर करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

सामाजिक समता शिवा पुरस्कारासाठी १७ मार्च पर्यंत अर्ज आमंत्रित

यवतमाळ, दि २ मार्च :- वीरशैव लिंगायत समाजाकरिता सामाजिक शैक्षणिक, सांस्कृतिक,समाज संघटनात्म़क, आध्यात्मिक प्रबोधन व आर्थिकदृष्टया कल्याणासाठी झटणारे नामवंत समाजसेवक, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, आध्यात्मीक प्रबोधनकार व साहित्यिक यांना सामाजिक समता शिवा पुरस्कार देण्यात येतो. यासाठी १७ मार्च पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.

व्यक्तिगत कार्यासाठी १ व सामाजिक संस्थेमधुन १ असा हा पुरस्कार देण्यात येतो. कमीत कमी १० वर्षे वैयक्तीक किंवा संघटनात्मक अभिजात कार्य करणाऱ्या व्यक्ती या पुरस्कारास पात्र असतील. यासाठी वयोमर्यादा पुरुष वय ५० वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त, महिला ४० वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त असावे.

सामाजिक संस्थासाठी पात्रता –

संस्था पब्लिक चॅरीटेबल ट्रस्ट व सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्ट १९६० खाली नोंदणीकृत असावी.स्वयंसेवी संस्थेचे समाजकल्याण क्षेत्रातील सेवा व कार्य १० वर्षाहून अधिक असावे. स्वयंसेवी संस्था राजकारणापासून अलिप्त असावी.

सदर पुरस्कारासाठी अर्जाचा नमुना सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यवतमाळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन पोलिस दक्षता भवन येथे विनामुल्य उपलब्ध आहे. अर्जासोबत नुकतेच काढलेले पासपोर्ट साईज फोटो ३ प्रतीत, वयाचा दाखला, शैक्षणिक पुरावा, सामाजिक कार्याची व त्या संबंधीत पुरावे, पोलिस विभागाचा चारीत्र्य पडताळणी दाखला सर्व तीन प्रतीत जोडणे आवश्यक आहे.अधिक माहिती करीता अर्जदारांनी १७ मार्च २०२३ पर्यंत या कार्यालयात अर्ज सादर करुन कार्यालयीन वेळेत संपर्क करावा असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण भाऊराव चव्हाण यांनी कळविले आहे.

धुलीवंदन ‍निमित्त मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद

यवतमाळ, दि ३ मार्च :- यवतमाळ जिल्ह्यात ७ मार्च रोजी धुलीवंदन सण साजरा होणार आहे. सदर दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील सर्व किरकोळ व घाउक मद्य विक्रीच्या अनुज्ञप्त्या मद्य विक्रीकरिता

बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहे. बंदच्या कालावधीत अनुज्ञप्ती मद्य विक्रीसाठी उघडी ठेवू नये, तसे आढळूनआल्यास संबंधीत अनुज्ञप्ती व अनुज्ञप्तीधारका विरुध्द कठोर कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Copyright ©