यवतमाळ सामाजिक

अलका कुबल हस्ते होणार सुनिल चव्हाण सन्मानित

प्रतिनिधी अहमदनगर

अलका कुबल हस्ते होणार सुनिल चव्हाण सन्मानित

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांचे वतीने दि.8 मार्च 2023 ला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्य वीरांसाठी , मान कर्तुत्वाचा.

सन्मान नेतृत्वाचा,हा राज्य स्तरीय पुरस्कार सोहळा माऊली संकुल सभागृह अहमदनगर येथे आयोजित करण्यात आला आहे.या सोहळ्यामध्ये माळेगांव तह.आर्णी जी.यवतमाळ येथील सुप्रसिध्द गायक तथा सिनेकलावंत सुनिल रामचंद्र चव्हाण यांची ,कला भूषण .या

पुरस्कारासाठी आयोजक बाबासाहेब पावसे यांनी निवड केली असून मराठी सिनेअभिनेत्री

अलका कुबल यांचे हस्ते प्रदान करण्यात येणार आहे या पूर्वी ही सुनिल चव्हाण यांना बरेचसे पुरस्कार मिळाले असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

Copyright ©