यवतमाळ सामाजिक

शाळे कडून काश्यपीचा गुणगौरव करण्यात आला

शाळे कडून काश्यपीचा गुणगौरव करण्यात आला

यवतमाळ-नुकताच काही दिवसा अगोदर वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात संपन्न झालेल्या पर्यावरण संवर्धन व विकास समिती आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संयुक्त विधमाणे पर्यावरण व समाजीक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सेवकांचा सन्मान व सत्कार सोहळा पार पडला त्या कार्यक्रमात यवतमाळ येथील काश्यपी विनोद दोंदल हिला देखील सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला होता,

देशाची भावी पिढी तयार करण्याचे तसेच आदर्श समाज निर्माण करण्याचे कार्य शिक्षक करत असतात, काश्यपीच्या अंगी असलेल्या सामाजिक कार्य करण्याच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून तसेच आपल्या शाळेती एका मुलीने समाजाप्रती चांगले सामाजिक कार्य करून आपले व आपल्या शाळेचे नाव लौकिक केल्या बद्दल काश्यपी दोंदल हिच्या कार्याचा गौरव झाला पाहिजे या हेतूने सनराईज इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक – मुख्याध्यापक दिनेश पवार यांच्या मार्गदर्शनाने, शाळेतील उपमुख्यध्यापक नितीन जगताप, निखिल पिंपोळे व अमोल मडावी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन गुणगौरव, कौतुक सोहळा पार पाडले याप्रसंगी शाळेतील असंख्य विध्यार्थी, गुरुजन मंडळी उज्वला निमन, मीनाक्षी ढोले, आरती शेलोळकर, कल्पना ठाकरे, अदिती यादव, इत्यादी शिक्षक वृंद उपस्थित होते.

Copyright ©