यवतमाळ सामाजिक

जागतिक श्रवण दिनी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

जागतिक श्रवण दिनी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

3 मार्च हा जागतिक श्रवण दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवासचे अवचित्य साधून यवतमाळ येथे कानाची काळजी आणि ऐकण्याची काळजी सर्वांसाठी हे साक्षात घडवूया, असे ब्रीदवाक्य घेऊन जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

श्रवण इंद्रिय म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य अंग आहे. जागतीक स्वास्थ संघटना ही दरवर्षी नवनवीन उपक्रम राबवित असते यावर्षी सुध्दा असाच उपक्रम हाती घेत जनजागृती ही लोकांपासून न करता स्वतः पासून करावी जेणेकरून आपल्या परिवारात किंवा नातेवाईकांमध्ये न ऐकू येणारे बाळ जन्माला आले तर त्यांची तपासणी करून वेळीच योग्य ते उपचार झाल्यास भविष्यात येणाऱ्या दिव्यांगत्वाला प्रतिबंध घालता येईल कानाचे आजार होण्याची कारणे म्हणजे कानाच्या नसेची कमजोरी, वाढत्या वयामुळे, ध्वनी प्रदूषणामुळे, अतितीव्र आवाजामुळे, जास्त प्रमाणात औषधे घेतल्याने, व मोबाईलचा अतिवापर तसेच कानामध्ये मळ असणे, कानाचा पडदा फाटणे, कानातील हाड तुटणे, कानामध्ये गाठ तयार होणे इत्यादी

कारणामुळे कानाचे आजार उद्भवतात.

श्रवण दोष तपासण्या ह्या कम्प्युटर डिजिटल युगामध्ये हल्ली एका दिवसाच्या बाळाची सुद्धा श्रवण चाचणी करता येते व्यवस्थित ऐकायला आल्यास आपल्या सर्वांगीण विकास होते म्हणून भाषाशास्त्राच्या अभ्यासानुसार कोणतेही मूल तीन वर्षाच्या आत लवकर भाषा बोलायला व ती व्यवहारात वापरायला शिकत असतो. कान नाक घसा तज्ञांच्या सल्ल्यानुसार बाह्यकर्ण आणि मध्यकर्ण दोषासाठी उपचार घ्यावा. त्याचबरोबर ऑडिओ लॉजिस्ट हे श्रवण चाचणी करून श्रवण दोष किती आहे हे सांगतात व त्यानुसार कानाची मशीन लावण्याचा सल्ला देतात परंतु मशीन चा फायदा न झाल्यास कॉक्लियर इम्प्लांट चा सल्ला देतात श्रावणदोष असणाऱ्या बालकांना योग्य ते श्रवण यंत्र लावून स्पीच थेरपीचा साह्याने मुलांचा भाषा आणि वाचा यांचा विकास करण्यास सह्या करतात तेव्हा असे काही लक्षण असल्यास लवकरात लवकर डॉक्टर चा सल्ला घेऊन बहिरेपणा सारख्या आजारावर नियंत्रण मिळविता येते अशी माहिती

डॉ. नीता सुखदेव ऑडियोलॉजिस्ट आणि स्पीच थेरापिस्ट

यवतमाल यांनी दिली

Copyright ©