यवतमाळ सामाजिक

यवतमाळ येथे श्री राम जन्मोत्सव शोभायात्रा समिती च्या कार्यालयाचे उद्घाटन

यवतमाळ येथे श्री राम जन्मोत्सव शोभायात्रा समिती च्या कार्यालयाचे उद्घाटन

दरवर्षी यवतमाळ ची श्री राम नवमी विदर्भातच नाही तर महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली आहे तसेच या वर्षी 30 मार्च रोजी श्री राम नवमी आहे राम नवमी मध्ये विश्व हिंदू परिषद व बजरंग दल चे कार्यकर्ता वेग वेगळ्या समिती मध्ये कार्य करून आपली जबाबदारी पार पाडत असतात या वर्षी होणाऱ्या राम नवमी निमित्त श्री राम जन्मोत्सव शोभायात्रा समिती च्या कार्यालयाचे उद्घाटन अवधूत व्यायाम शाळेच्या समोर पार पडले या उद्घाटन कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयं सेवक संघ चे विभाग प्रचारक अनुप कटारे , विश्व हिंदू परिषद विभाग मंत्री राम लोखंडे,विश्व हिंदू परिषद जिल्हा अध्यक्ष संतोष हरणखेडे,उपाध्यक्ष मनोज औदार्य प्रमुख उपस्थित होते यावेळी श्री राम नवमी शोभायात्रा समिती मध्ये वेग वेगळ्या समिती गठित करण्यात आल्या ज्यामध्ये शोभायात्रा निघणाऱ्या मार्गावर ध्वज लावने , बाईक रॅली, झाकी समिती, सुरक्षा समिती अश्या वेगवेगळ्या समित्या तयार करण्यात आल्या, राम नवमी पर्यंत कार्यकर्त्यांच्या 10 मोठ्या बैठकी होणार आहे तसेच बजरंग दल चे जवळपास 500 कार्यकर्ता या शोभा यात्रे मध्ये सुरक्षा समिती ची जबाबदारी घेणार आहे,आणि यवतमाळ मधल्या दुर्गाउत्सव मंडळ, गणेशउत्सव मंडळ अश्या विविध मंडळाना असे हैं सुद्धा करण्यात आले की मंडळा तर्फे झांकी काढून ती या भव्यदिव्य शोभायात्रेत शामिल व्हावे असे वक्तव्य राम लोखंडे यांनी केले या प्रसंगी शेकडो रामभक्त, कार्यकर्ता मातृशक्ति, दुर्गा वहिनी उपस्थित होते

Copyright ©