यवतमाळ सामाजिक

अल्पवयीन मुले गुन्हे गारी कडे, पोलिसाची बघ्याची भूमिका

अल्पवयीन मुले गुन्हे गारी कडे, पोलिसाची बघ्याची भूमिका

यवतमाळ:- जिल्ह्यात सध्या गुंडाराज सुरू असल्याने सर्व सामान्य चिंतेत सापडले आहे, या मुळे अनेक कुटुंब दहशतीत वावरत असल्याचे दिसून येत आहे तर गेल्या काही वर्ष्या पासून अनेक परिवार आपल्या अल्पवयीन मुलाला गुन्हेगारी कडे जात असल्याचे उघड्या डोक्याने पाहून हतबल झाले आहे, .यवतमाळ मधील गाव गुंडामुळे यवतमाळकर त्रस्थ झाले असून रस्त्यात महिला मुलींचे चालणे फिरणे अतिशय अवघड झालेले आहे.न्यायालयाने काही गावगुंडाना तडीपार केलेले असून ती तडीपारी फक्त न्यायालयातून कागदावरच राहिलेली आहे.गावगुंड मात्र खुलेआम अवजारे घेऊन दहशत माजवित आहे हि बाब पोलीस प्रशासनास हि अवगत असतानाही यांचे काही करू शकत नाही, हि घटना पाहता जणू काही आपण हिंदी सिनेमा तर बघत नाही ना असा भास होतो,अशी अवस्था जिल्ह्याची झाली आहे. अनेक गुन्हेगार तडीपार झालेले असताना,गावात खुलेआम वावरताना दिसताहेत आणि पोलिसांची त्यांचे कडे पाठ दाखवल्या जाते,याचा अर्थ की पोलीस गुंडाची पाठराखण तर करीत नाहि ना! असा सवाल सर्व सामान्यान कडून करण्यात येत आहे

 

अनेक गुंड शहरात वेगवेगळे मनसुबे करीत असल्याचे सांगण्यात येत आहे,अल्पवयीन मुलांना पैसा,नशा,त्यांच्या दैनिक गरजा पूर्ण करण्यात येत असल्याने ते कोणत्याही गुन्ह्याला सामोरे जाण्यास तयार असतात अशातच अनेक आपला जम बसविन्यासाठी नियोजन करण्यात लागले आहे या कडे पोलीस अधीक्षक यांनी लक्ष देण्याची गरज आहे,अन्यथा देशाचे भविष्य उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नसल्याचे बोलल्या जात आहे. अल्प वयीन मुलांकडून घडलेला गुन्हा गुन्हा होत नसल्याचा ,फायदा टोळी धारकांना होणार असल्याने हि रणनीती कापण्यात येत आहे हि बाब यवतमाळ करांसाठी चिंतेची ठरत आहे

Copyright ©