यवतमाळ सामाजिक

आरोपीची पाठराखण करणा-या पांढरकवडा पोलीस प्रशासनाच्या विरोधात आदिवासींचा एल्गार

आरोपीची पाठराखण करणा-या पांढरकवडा पोलीस प्रशासनाच्या विरोधात आदिवासींचा एल्गार

१ मार्च पासून साखळी उपोषण सुरू

पांढरकवडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या केळापूर ग्रामपंचायतीचे सरपंच सुरेश अनमुलवार हे दिनांक 20/2/2023 रोजी गावातील एका आदिवासी विधवा महिलेला जागेच्या वादावरून सार्वजनिक ठिकाणी मारहाण केली व जातीवाचक व अश्लील शिवीगाळ केली त्यामुळे यातील अन्यायग्रस्त महिलेने पांढरकवडा पोलीस स्टेशनला फिर्यादी वरून 294,323,506 आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंदक अधिनियम 1989 3 (1) (r), 3(1)(s), आणि 3(2)(va) नुसार गुन्हे दाखल केले पण आज या घटनेला आठ दिवस होऊनही आरोपीला अटक करण्यात आली नाही त्यामुळे यातील आरोपीला ताबडतोब अटक करावी, तसेच त्याचेवर IPC 354 आणि एट्रोसिटी 3(1), 7, 3(1), 3(1)11 नुसार गुन्हा दाखल करा आणि या आरोपीची पाठराखण करणा-या पांढरकवडा ठाणेदाराला यात सह आरोपी करा व निलंबित करा इत्यादि मागण्या घेऊन आज दिनांक १मार्च पासून येथील उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर आदिवासी समाज बांधवांतर्फे साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. उपोषण स्थळाला आज तालुक्यातील आदिवासींच्या विविध संघटना प्रमुखांनि भेटी दिल्या असून या साखळी उपोषणाला पाठिंबा दर्शविला आहे, जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत साखळी उपोषण टप्प्या टप्प्याने सुरू राहतील अशी घोषणा आदिवासी नेते निरंजनभाऊ मसराम यांनी केली आहे शंकर गेडाम, नागोराव गेडाम, बंडू सोयाम अंकित नैताम यांनी पांढरकवडा तहसीलदार यांची भेट घेऊन वरील मागण्या बाबत चर्चा केली.

अन्यायग्रस्त अंजनाबाई माडकाम सह रेखा तायडे,निर्मला मेश्राम,अनिता मडकाम, सिंधुबाई मडकाम, पांडुरंग पेंदोर अनिल मडकाम सह साखळी उपोषणाला बसलेली आहे.

Copyright ©