यवतमाळ सामाजिक

आम आदमी पार्टीच्या वतीने संविधान चौकात कापूस जलाओ आंदोलन ; सरकार 

आम आदमी पार्टीच्या वतीने संविधान चौकात कापूस जलाओ आंदोलन ; सरकार 

कापुसासह सोयाबीनच्या दरात मागीलवर्षीच्या तुलनेत बरीच घसरण झाली आहे.यामुळे शेतकऱ्यांनी शेतीमाल घरातच साठवून ठेवला आहे.आज ना उद्या दर वाढतील याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. प्रमुख शेतीमालाचे दर पडल्याने शेतकऱ्यांनी शासनाच्या धोरणांवर नाराजी व्यक्त केली आहे.या विरोधात शेतकऱ्यांच्या हितासाठी आम आदमी पार्टी मैदानात उतरली असून आम आदमी पार्टीच्या वतीने यवतमाळ शहरातील संविधान चौकामध्ये कापूस जलाओ आंदोलन करण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी सह शेतकरी बांधव उपस्थित होते.जिल्ह्यातील शेतकरी मागील काही वर्षापासून नगदी पीक म्हणून सोयाबीन, कपाशी या पिकाकडे वळले आहेत.मागील खरिपामध्ये चार लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती तर दोन लाख हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती.

जुलैमधील अतिवृष्टीने सोयाबीन, कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यातून काही प्रमाणात शिल्लक राहिलेल्या या पिकांच्या काढणीनंतर दरात घसरण झाल्याने शेतकरी कमालीचे अडचणीत आले आहेत.

यंदा कपाशीला चांगला भाव मिळेल, अशी आशा बाळगून असलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे.हे कापुस जलाओ आंदोलन आज दिनांक १ मार्च रोजी सकाळी ११ वाजता बस स्टँड चौक आंबेडकर पुतळा जवळ आम आदमी पार्टी द्वारा शेतकरी आंदोलन कापूस जलाओ आंदोलन करण्यात आले. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माला अर्पण करून आपचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष माजी खासदार हरिभाऊ राठोड, पश्चिम विदर्भ सह संयोजक अमन भाई आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकरी यांनी सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली व शेतकऱ्यांच्या कापूस व सोयाबीनला योग्य दर मिळावा यासाठी संविधान चौकामध्ये कापूस जाळून आंदोलन करण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष वसंतराव ढोके तालुका अध्यक्ष शेख मोबीन, यवतमाळ शहर अध्यक्ष गुणवंतराव इंदूरकर,जिल्हा युवा आघाडी संयोजक आकाश चमेडिया, यवतमाळ जिल्हा सचिव ॲड.मनीष माहुलकर, जिल्हा कोषाध्यक्ष विलास वाडे,डॉ.गणेश नाईक,रमेश गिरोलकर इत्यादी पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात आंदोलनाला सुरुवात झाली राज्यातील शेतकरी हवालदिल झाला असून चिंताग्रस्त आहे कापूस आणि सोयाबीन यांचा भाव दिवसेंदिवस कमी होत असून या परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारने लक्ष घातले नाही,तर शेतकरी उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे.बी-बियाणे कीटकनाशक औषध यांचे भाव गगनाला भिडले आहे शेतकऱ्यांच्या मालाला मात्र योग्य भाव मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे.कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना जीएसटी लावण्यात येत आहे.ही बाब अत्यंत गंभीर आहे.आपल्या देशात संविधानिक तरतुदीनुसार शेती उत्पादनावर कुठलाही कर अथवा टॅक्स लावण्याचा प्रघात नाही.तरी पण व्यापाऱ्याकडून जीएसटी वसूल करण्यात येत आहे.मागील वर्षी जाहीर केलेल्या पीक नुसकान भरपाई अजूनही शेतकऱ्याला मिळालेली नाही यासह विवीध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांचे मार्फत निवेदन देण्यात आले.याप्रसंगी आम आदमी पार्टीचे असंख्य कार्यकर्ते शुभम मेश्राम, राधेश्यामजी चावरे, किसनरावजी बोरकर,रोशन रामटेके,जावेद शेख, नागेश्वरराव भुते, युसुफ पठाण, रवी भोंगाडे, योगेश बारशेट्टीवार,कवीश्वर पेंदोर,निरंजन मेश्राम, शेख रशीद, गजानन नाईक, फजलू खान, भीमराव गोंधळे, नामदेव कोपरे, जगदीश महाराज, सुनंदाताई साखरकर,रुपेश ढवळे,ॲड.अमित पवार, चंदन मजेठिया,गोपाल गावंडे इत्यादी असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Copyright ©