यवतमाळ सामाजिक

खा. भावनाताई गवळी यांनी गावात जाऊन समस्यांचा केला निपटारा

खा. भावनाताई गवळी यांनी गावात जाऊन समस्यांचा केला निपटारा

लेंगी उत्सवात जाऊन बंजारा बांधवांचा वाढविला उत्साह

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघाच्या खासदार भावनाताई गवळी यांनी यवतमाळ तसेच दारव्हा तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन नागरीकांच्या समस्या सोडविल्या. जनता दरबार भरवून तसेच अधिका-यांशी संवाद साधून नागरीकांच्या समस्यांचा निपटारा केल्याने नागरीकांनी सुध्दा समाधान व्यक्त केले आहे.

बोरीअरब येथे परीसरातील आठ ते दहा ग्रामपंचायत च्या नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी जनता दरबार भरविण्यात आला. याठिकाणी बोरीअरब चे सरपंच लक्ष्मण वांजरेकर, उपसरपंच ओम लढ्ढा, सदस्य प्रफुल्ल खडसे, विनोद कावरे, किशोर तांगडे, उपतालुका प्रमुख डॉ. नाईक, कंझरा चे सरपंच उमेश लांडे, बोरी बु. चे माजी सरपंच मुकेश कळंबे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. नागरीकांनी आपल्या घरकूल, रस्ते, पाणी, विज, पोलिस विभागाशी संबंधीत तक्रारी इत्यादीबाबत समस्या सांगून निराकरण करुन घेतले. बचतगटातील महिलांच्या सुध्दा समस्या सोडविण्यात आल्या. यानंतर पाथ्रडदेवी येथील आरोग्य शिबीराचे उद्घाटन भावनाताई गवळी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सरपंच जयसिंग राठोड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ओमशिव राठोड उपस्थित होते. हे शिबीर ग्रामपंचायत तसेच बोरीअरब येथील कला व वाणिज्य महाविदयालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. याठिकाणी असलेल्या अभ्यासीके साठी स्पर्धा परीक्षेची पुस्तके उपलब्ध करुन देणार असल्याचे भावनाताई गवळी यांनी सांगीतले. वडगाव गाढवे येथील लेंगी उत्सवात भावनाताईंनी भेट दिली. येथे उपसरपंच पंजाबराव जाधव तसेच बंजारा बांधवांनी त्यांचा सत्कार केला. विशेष म्हणजे लेंगी उत्सवातील गाण्यावर ठेका धरीत महिलांसोबत भावनाताईंनी नृत्य केले. मोझर येथे नथ्थुबाबा मोझरकर महाराज यांच्या 33 वा पुण्यतिथी महोत्सवानिमीत्त आयोजित भागवत सप्ताहात उपस्थित राहुन मार्गदर्शन केले. येथील भजनी मंडळीला लाऊड स्पीकर संच देणार असल्याचे घोषीत केले. याप्रसंगी मोझर सरपंच सौ. बेबीताई अजाबराव शहाणे, नेमिनाथ बैसकार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यवतमाळ तालुक्यातील बोरज येथे मुंगसाजी महाराज पालखीचे पुजन केले. याठिकाणी सरपंच सौ. मनिषा निलेश नेवारे तसेच ग्रामपंचायत सदस्यांसोबत विकासात्मक विषयावर चर्चा केली. तिवसा येथे जलजीवन मिशन अंतर्गत विहीरीचे भूमिपुजन भावनाताई गवळी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी विहीरीसाठी जागा उपलब्ध करुन देणा-या कृषी भूषण आनंदराव सुभेदार यांचा सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे तिवसा गावातील अनेकांनी भावनाताई गवळी यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना लगेच शिवसेनेतील स्थानिक पदे देऊन गौरविण्यात आले. याच भागातून जाणा-या वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वे प्रकल्पाच्या कामाची पाहणी भावनाताईंनी केली. तिवसा सरपंच नरेश राठोड, उपसरपंच अभिजीत राठोड, तांडानायक चरनसिंग नाईक, उपतालुका प्रमुख रणवीर चव्हाण उपस्थित होते. या संपुर्ण कार्यक्रमाचे नियोजन शिवसेनेचे तालुका प्रमुख गुणवंत ठोकळ यांनी केले. यावेळी शिवसेनेचे तालुका संघटक सुरेश ढेकळे, यवतमाळ शहर प्रमुख पिंटु बांगर उपस्थित होते.

समस्या सोडविण्यास प्राधान्य

समाजात नागरीकांना अनेक कामे करतांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळेच आम्ही विविध ठिकाणी जनसंपर्क कार्यालय सुरु करुन नागरीकांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला आहे. काही सरकारी अडचणी येत असतील किंवा सार्वजनिक कामे रखडली असतील तर नागरीकांनी आमच्या जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधावा आम्ही त्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करु.

Copyright ©