यवतमाळ सामाजिक

३ मार्च पासून श्यामबाबा फाल्गून महोत्सवाचे आयोजन

३ मार्च पासून श्यामबाबा फाल्गून महोत्सवाचे आयोजन

यवतमाळ : महंत बाबा रामलखनदासजी महाराज यांच्या प्रेरणेने महंत आचार्य संगीत कृष्णदास (सावरीया बाबा) यांच्या सानिध्यात दि. ३ ते ४ मार्च पर्यंत श्री बालाजी मंदिर बालाजी चौक, यवतमाळ येथे श्रीश्यामबाबा फाल्गून महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त दि. ३ मार्च रोजी सकाळी ८.३० वाजता भव्‍य निशाण यात्रा, श्री. बालाजी मंदिर बालाजी चौक, यवतमाळ येथून प्रारंभ होवून शहराच्या प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत श्री. श्यामधाम (बालाजी मंदिर) येथे विसर्जीत होईल. तर सायंकाळी ६ वाजता बाबा अनुपम पुष्पशृंगार,

सायंकाळी ७ वाजता ५६ भोग एवंम ज्योत दर्शनचे आयोजन तर सायंकाळी ७ वाजता एक श्याम खाटूवाले श्याम के नाम अंतर्गत बोकारो पटणा-बिहार निवासी सुश्री अर्चना गोस्वामी, गोपाल वज्रवासी, विनोद निमोदिया यवतमाळ, गीत चमेडिया यांच्या श्रीशाम भजन संध्येचे आयोजन श्रीश्याम धाम बालाजी मंदिर बालाजी चौक, यवतमाळ येथे करण्यात आले आहे. तर दि. ४ मार्च रोजी सकाळी ९ वाजता श्याम बाबा अभिषेक ज्योत एवमं आरती सकाळी ११ वाजता महाप्रसाद १२ ते ३ पर्यंत श्री श्यामधाम बालाजी मंदिर बालाजी चौक, यवतमाळ येथे करण्यात आले आहे. याप्रसंगी श्यामबाबा भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे. दिनांक ३ मार्च रोजी निघणाऱ्या भव्‍य निशाण यात्रेमध्ये श्री श्यामबाबा १०१ मनोकामना निशाण व ढोल ताशांच्या गजरात ही निशाण यात्रा निघणार आहे. असे आयोजन समितीच्यावतीने कळविण्यात आले आहे.

Copyright ©