यवतमाळ सामाजिक

सौ. शिलादेवी शा. बोरा पब्लिक स्कुल मध्ये विज्ञान दिना निमित्य ‘विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन

सौ. शिलादेवी शा. बोरा पब्लिक स्कुल मध्ये विज्ञान दिना निमित्य ‘विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन

28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतीय भौतिकवादी, सर चंद्रशेखर वेंकट रमण यांनी भारतातील रमण परिणामाचा शोध लावला. तेव्हा पासून 28 फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला सौ.शिलादेवी बोरा पब्लिक स्कुल मध्ये सुध्दा विज्ञान दिना निमित्य विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले,या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव के. संजय सर अध्यक्ष म्हणून लाभले तसेच सुसंस्कार विदया मंदिर येथील शिक्षिका प्रियंका वाधाडे, नलिनी डवरे प्रमुख पाहूणे म्हणूत उपस्थित होत्या. “आजचे युग हे विज्ञानाने युग आहे, विज्ञानाने आपल्या जिवनामध्ये खूप मोठी भर घातली आहे. या विज्ञान दिनानिमित्य विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन शिलादेवी बोरा पब्लिक स्कूल मध्ये इ १ली व ५वी च्या विद्यार्थासाठी आयोजित करण्यात आले होते. सर्वप्रथम या प्रदर्शनाचे

उद्घाटन फित कापून करण्यात आले. प्रदर्शनाचे उद्घाटन हे संस्थेचे सचिव के संजय सर आणि या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहूणे प्रियंका वाघाडे व नलिनी डवरे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या कार्यक्रमाला

लाभलेले अध्यक्ष व प्रमुख पाहूणे यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. संस्थेचे सचिव के संजय सर यांचे स्वागत अर्चना कडू , नलिनी डवरे यांचे स्वागत हर्षा डेरे व प्रियंका वाघाडे यांचे स्वागत पल्लवी देशमुख यांनी केले

या विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनि स्वतः च्या हाताने बनवलेले एका पेक्षा एक सरस अशा विज्ञान प्रतिकृतीनी सर्वाचे लक्ष वेधून घेण्यात आले या विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रतिकृती प्रदर्शित केल्या जसे की, सेन्स ऑरगन, मून, वॉटर सायकल, सोलार सिस्टिम, वोलकांनो, सेव अर्थ, लूनार इकलिप्स ईत्यादी प्रतिकृती सह विज्ञान प्रदर्शन आयोजन करण्यात आले होते या विज्ञान प्रदर्शनीमध्ये विद्यार्थांनी उत्कृष्ट पध्दतीने विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.

या प्रदर्शनीमध्ये संघ अ (वर्ग १ ते वर्ग ३) संघ ब( वर्ग ४ थी व वर्ग ५वी) यामधून क्रमांक काढण्यात आले होते या प्रदर्शनीमध्ये प्रथम क्रमांक वर्ग ३ री आस्था चिरडे व अपूर्वा मेश्राम व वर्ग १मधून स्नेहल ठाकरे व पार्थ चिरंडे यांना देण्यात आला.

तृतीय क्रमांक वर्ग ३ री मधून कोमल जुमनाके व अयोध्या शिरपूरकर ह्यांनी पटकावला.

संच B मधून प्रथम क्रमांक वर्ग ५वी मधून अथांग डेहनकर, द्वितीय क्रमांक वर्ग ५ वी मधून त्रिशा चिरडे व तमान्ना निकम, व धनश्री नालमवार आणि तृतीय क्रमांक वर्ग ४ थी मधून पूर्वी बोकडे स्वरा उड़ाके, रिदिमा कुमरे व नागेश सुरर्यवंशी यांनी पटकावला

या विज्ञान प्रदर्शनीला पालकांनी सुध्दा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. व विद्यार्थ्यांचे कौतूक केले या विज्ञान प्रदर्शनीचे संचालन शाळेच्या मुख्याध्यापिका श्वेता बंदूके मॅडम यांनी केले व आभार प्रदर्शन वैशाली महाजन मॅडम यांनी केले. ह्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शाळेच्या शिक्षिका अर्चना कडू, मनिषा ताजने, वैशाली महाजन, हर्षा डेरे पल्लवी देशमुख व क्रांती अलोने व पूनम ताई शारदाताई यांचे सहकार्य लाभले.

Copyright ©